मुकेश अंबानींच्या डिनर पार्टीत ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 12:25 PM2017-12-09T12:25:23+5:302017-12-09T17:55:23+5:30
विश्वसुंदरीचा ताज मिळविलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ज्या समारंभात अथवा पार्टीत उपस्थित राहते त्याठिकाणच्या सर्वांच्याच नजरा तिच्याकडे भिरभिरत असतात. ऐश्वर्याचे ...
व श्वसुंदरीचा ताज मिळविलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ज्या समारंभात अथवा पार्टीत उपस्थित राहते त्याठिकाणच्या सर्वांच्याच नजरा तिच्याकडे भिरभिरत असतात. ऐश्वर्याचे सौंदर्य अजूनही घायाळ करणारे असून, तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात. दरम्यान, गेल्या रात्री उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीवरून सध्या ऐश चर्चेत आली आहे. पार्टीत ऐश पती अभिषेक बच्चन याच्यासोबत पोहोचली होती. यावेळी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती. या ड्रेसमधील तिचे काही फोटोज् आस्था शर्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु या ड्रेसची किंमत खºया अर्थाने आता चर्चिली जात आहे.
होय, ऐशने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या ड्रेसचे नाव गोल्डन सिमिर आहे. हा ड्रेस ८५ टक्के पॉलिस्टर असून, १५ टक्के सिल्क आहे. या ड्रेसला गाउन असेही म्हटले जाते. याची किंमत थक्क करणारी असून, सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची आहे. होय, या ड्रेसची किंमत तीन लाख ७३ हजार ९०५ रुपये इतकी आहे. बच्चन परिवाराची सून असलेल्या ऐश्वर्यासाठी ही किंमत फारशी नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. खरं तर ज्या डिझायनरने हा ड्रेस डिझाइन केला असेल, त्यानेच ऐश्वर्याला हा ड्रेस परिधान करण्यासाठी पैसे दिले असतील.
असो, ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या ‘फन्ने खां’ या चित्रपटावर काम करीत आहे. ‘फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत.