सलमान खानच्या आधी ऐश्वर्या राय या अभिनेत्याच्या प्रेमात होती वेडी, पण मनीषा कोईराला ठरली व्हिलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:11 AM2023-07-26T10:11:50+5:302023-07-26T14:15:58+5:30

माझ्यासाठी त्याने ऐश्वर्या रायला सोडले, असं मनीषाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Aishwarya rai had an affair with famous model rajeev moolchandani before salman khan manisha koirala | सलमान खानच्या आधी ऐश्वर्या राय या अभिनेत्याच्या प्रेमात होती वेडी, पण मनीषा कोईराला ठरली व्हिलन

सलमान खानच्या आधी ऐश्वर्या राय या अभिनेत्याच्या प्रेमात होती वेडी, पण मनीषा कोईराला ठरली व्हिलन

googlenewsNext

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही बॉलिवूडमधील दिग्गज आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंगमुळे ती बराच काळ चर्चेत राहिली होती. ऐश्वर्या राय १९९४ साली मिस वर्ल्ड बनली होती. त्यानंतर तिने अभिनयाच्या जगतात प्रवेश केला.

मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्या रायच्या रूपेरी कारकिर्दीस सुरुवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच तिची पर्सनल लाईफदेखील नेहमीच चर्चेत राहिली.

ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर ही प्रेमकहानी फुलली होती. पण काहीच वर्षांत त्यांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याने हे रिलेशनशीप कधीच मीडियात कबूल केले नाही. राजीव हा त्याकाळात अतिशय प्रसिद्ध मॉडेल होता.  90 च्या दशकात राजीव एक लोकप्रिय मॉडेल होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्याच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली होती. 

 याचदरम्यान 1994 मध्ये मनीषाने एका मॅगझिनला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीने खळबळ माजली. 
 मी राजीवला डेट करतेय आणि माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडले, असे मनीषाने या मुलाखतीत सांगितले. 

 ऐश्वर्या व राजीवच्या ब्रेकअपबद्दल बोलणा-या मनीषाला ऐश्वर्याने सणसणीत उत्तर दिले होते. 1999 मध्ये एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यावर बोलली होती. ती म्हणाली होती की, ‘मी राजीव व मनीषाच्या लव्हस्टोरीचा भाग नाही. दोन महिन्यानंतरच मनीषा व राजीवचे  ब्रेकअप झाले झाले होते. 
 

Web Title: Aishwarya rai had an affair with famous model rajeev moolchandani before salman khan manisha koirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.