'हम दिल दे चुके सनम' पाहून नाराज होत्या जया बच्चन?; संजय लीला भन्साळींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:58 AM2024-06-19T10:58:28+5:302024-06-19T10:59:25+5:30

Jaya bachchan: 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात यावा यासाठी जया बच्चन यांनी पुढाकार घेतला होता. मात्र..

aishwarya-rai-salman-khan-jaya-bachchan-hum-dil-de-chuke-sanam-sanjay-leela-bhansali | 'हम दिल दे चुके सनम' पाहून नाराज होत्या जया बच्चन?; संजय लीला भन्साळींनी केला खुलासा

'हम दिल दे चुके सनम' पाहून नाराज होत्या जया बच्चन?; संजय लीला भन्साळींनी केला खुलासा

बॉलिवूडच्या इतिहासात संजय लीला भन्साळी यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यातलाच एक सिनेमा म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास २५ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, आजही तो प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. सलमान खान (salman khan), ऐश्वर्या राय  (aishwarya rai)आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा इंडस्ट्रीमध्ये तुफान गाजला. इतकंच नाही तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला होता. कलाविश्वातही अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं होतं. परंतु, ऐश्वर्याच्या सासूबाई अर्थात अभिनेत्री जया बच्चन हा सिनेमा पाहून नाराज झाल्याचं म्हटलं जातं.

'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात यावा यासाठी खुद्द जया बच्चन यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, हा सिनेमा फेस्टिव्हलमध्ये दाखवल्यानंतर जया बच्चन यांची रिअॅक्शन पाहून हा सिनेमा त्यांना आवडला नाही, असा समज संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा झाला होता. 'स्टार प्लस'च्या 'स्टार टॉक'मध्ये त्यांनी त्यांच्या झालेल्या गैरसमजाविषयी भाष्य केलं.

"या सिनेमाची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जवळपास सगळ्याच फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला आहे. या सिनेमाची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड होण्यामागे दोन व्यक्तींचा हात आहे. एक डोरोथी आणि दुसरी जया बच्चन," असं भन्साळी म्हणाले.

"डोरोथी बर्लिनवरुन आपल्याकडे एका सिनेमाची निवड करण्यात आली होती. त्यावेळी एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना हा सिनेमा पाहण्यास सांगितला. इतकंच नाही तर त्याने तिच्यासोबत हा सिनेमा पाहिला आणि तिला तो समजून सांगितला. ज्यामुळे तिला हा सिनेमा आवडला. आणि, दुसरी व्यक्ती म्हणजे जया बच्चन (jaya bachchan). हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात यावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते."

संजय भन्साळींचा झाला गैरसमज

"ज्या दिवशी या सिनेमाचं स्क्रीनिंग पार पडलं त्यावेळी जया बच्चन यांनी तो पाहिला आणि बाहेर येऊन फक्त हसल्या. ज्यामुळे मला वाटलं की त्यांना हा सिनेमा आवडला नाहीये. पण हे सगळं सिनेमा रिलीज होण्यापूर्वी घडलं होतं."

जया बच्चन यांना आवडला नाही सिनेमा?

"माझा जया बच्चन यांच्याविषयी गैरसमज झाला होता ज्यामुळे एकदा त्यांनी मला फोन केला आणि, तुम्हाला काय वाटतंय मला हा सिनेमा आवडला नाही? पण, मला हा सिनेमा आवडलाय हे सांगायची माझी ती एक पद्धत होती. मला इतकंच त्यातून सांगायचं होतं की, बर्लिनला या सिनेमासाठी शिफारस करावी आणि तो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायचे."

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या अनेक सिनेमांमध्ये सलमान, अजय आणि ऐश्वर्याने काम केलं आहे.  अलिकडेच भन्साळींची हिरामंडी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी ओटीटीवर पदार्पण केलं आणि त्यांची पहिलीच सीरिज तुफान गाजली.

Web Title: aishwarya-rai-salman-khan-jaya-bachchan-hum-dil-de-chuke-sanam-sanjay-leela-bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.