अभिषेकच्या नवीन गाडीतून 'जलसा'वर पोहचली ऐश्वर्या राय, शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली आराध्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:59 PM2024-09-03T16:59:40+5:302024-09-03T17:00:56+5:30

ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेक बच्चनच्या नव्या कारमधून जलसा येथे पोहोचली आहे. यावेळी ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाली.

Aishwarya Rai spotted at Bachchan home Jalsa with Aaradhya Bachchan | अभिषेकच्या नवीन गाडीतून 'जलसा'वर पोहचली ऐश्वर्या राय, शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली आराध्या

अभिषेकच्या नवीन गाडीतून 'जलसा'वर पोहचली ऐश्वर्या राय, शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली आराध्या

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.  आता नुकतंच  ऐश्वर्या राय बच्चनही तिच्या सासरच्या घरी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या जलसामध्ये पोहोचली आहे. तिच्यासोबत यावेळी मुलगी आराध्यादेखील पाहायला मिळाली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेक बच्चनच्या नव्या कारमधून जलसा येथे पोहोचली आहे. यावेळी ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये ऐश्वर्या सुंदर दिसली. तर यावेळी आराध्या ही  शाळेच्या ड्रेसमध्ये होती. त्यावरुन आराध्या शाळेतून थेट घरी आल्याचं दिसतंय. दोघीही गाडीतून खाली उतरल्या आणि लगेच घरात शिरल्या. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.  


दरम्यान, काही दिवसांपुर्वी दुबई विमानतळावर ऐश्वर्या राय,आराध्या बच्चन आणि अभिषेक बच्चन हे एकत्र दिसले होते. त्यांचा एक व्हिडीओही समोर आला होता, ज्यामध्ये ते तिघेही बसमध्ये चढताना पाहायला मिळाले होते. ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर म्हणजेच 2011 मध्ये या जोडप्याला आराध्या ही मुलगी झाली. आराध्यादेखील कायम चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते. 

Web Title: Aishwarya Rai spotted at Bachchan home Jalsa with Aaradhya Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.