Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 09:57 IST2024-05-16T09:57:21+5:302024-05-16T09:57:54+5:30
यंदाच्या कान्समध्ये भारतीय अभिनेत्रींच्या फॅशनकडे देशाचं लक्ष

Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival) ला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) कान्समध्ये सहभागी होणार आहे. कालच ती लेकीसह विमानतळावर पोहोचली. मात्र यावेळी तिच्या हाताला प्लास्टर लावलेलं पाहून चाहते चिंतेत पडले. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसलं. तिची लेक आराध्या बच्चन सोबत होती.
फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवण्यासाठी अनेक तारे तारका पोहोचले आहेत. ऐश्वर्या राय बच्चनचा विमानतळावरील व्हिडिओ आता व्हायरल होतोय. ऐश्वर्या लेकीसह कान्सच्या दिशेने रवाना झाली. यावेळी तिने ओव्हरकोट ड्रेस परिधान केला होता. तर आराध्या कॅज्युअल लूकमध्ये दिसली. यावेळी ऐश्वर्याच्या हाताला प्लास्टर लावलेलं बघून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आराध्याने आईच्या हातातून पर्स घेत स्वत: धरली. ही मायलेकीची जोडी नेहमीच कॅमेऱ्यासमोर आली की सर्वांचं लक्ष वेधून घेते. ऐश्वर्याने पापाराझींना हसतच पोज दिली आणि ती पुढे गेली. दोघींचा हा व्हिडिओ सोोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऐश्वर्या २००२ सालीच कान्समध्ये पदार्पण केलं होतं. फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायशिवाय उर्वशी रौतेला, किआरा अडवाणी, शोभिता धुलीपाला, जॅकलीन फर्नांडिस आणि आदिती राव हैदरी या देखील सहभागी होणार आहेत. भारतीय सुंदरींच्या फॅशनकडे देशाचं लक्ष लागलं आहे. दीपिका पदुकोण यंदा प्रेग्नसींच्या कारणामुळे फेस्टिव्हलमध्ये दिसणार नाही.