ऐश्वर्या रायच्या या अभिनेत्याला काम मिळणं झालं होतं बंद, विदेशात झालेला स्थायिक; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:09 IST2025-01-20T17:08:44+5:302025-01-20T17:09:36+5:30

या अभिनेत्याकडे यश, प्रसिद्धी आणि संधी सर्वकाही होते. पण एका निर्णयामुळे त्याची कारकीर्द अशी बिघडली की त्याला पुन्हा रुळावर आणणे कठीण झाले.

Aishwarya Rai's actor Mirza Abbas Ali stopped getting work, settled abroad; but... | ऐश्वर्या रायच्या या अभिनेत्याला काम मिळणं झालं होतं बंद, विदेशात झालेला स्थायिक; पण...

ऐश्वर्या रायच्या या अभिनेत्याला काम मिळणं झालं होतं बंद, विदेशात झालेला स्थायिक; पण...

सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांची कारकीर्द खूपच धक्कादायक आहे. त्यांच्याकडे सर्व गुण आहेत ज्यामुळे ते एक स्टार बनू शकतात, परंतु एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांचे नशीब कायमचे बदलते. आज अशाच एका मोठ्या स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याच्याकडे यश, प्रसिद्धी आणि संधी सर्वकाही होते. पण एका निर्णयाने त्याची कारकीर्द अशी बिघडली की त्याला पुन्हा रुळावर आणणे कठीण झाले. काही मोठ्या साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच या अभिनेत्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्यासोबतही काम केले आहे.

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो म्हणजे मिर्झा अब्बास अली (Mirza Abbas Ali). अब्बास अली याने १९९४ मध्ये एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९९६ मध्ये तमीळ चित्रपटातून पदार्पण केले. प्रिया ओ प्रिया, राजहंसा, राजा, कन्नेज़ुथी पोट्टुम थोट्टू, सुयमवरम आणि पदयप्पा यासारख्या बऱ्याच तेलगू आणि तमीळ हिट सिनेमात काम केले. मिर्झा अब्बास अलीने कमल हसन आणि शाहरुख खान यांच्या ‘हे राम’मध्येही छोटी भूमिका साकारली होती. अलीचा मोठा हिट चित्रपट कंदुकोंदैन कंदुकोंदैन होता, ज्यामध्ये त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम केले होते. यात मामूटी, अजित कुमार आणि तब्बू देखील होते. यानंतर तो मिन्नाले या चित्रपटात दिसला.

२००२ मध्ये मिर्झा अब्बास अलीने अंश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. अलीने हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि दक्षिणेचे अनेक प्रोजेक्ट नाकारले. नंतर त्यांनी काही साऊथ चित्रपटांमध्ये काम केले, पण ज्याचे काम थांबले. शेवटी, त्याला तेलुगू चित्रपटांमध्ये फक्त केमिओ आणि सहाय्यक भूमिका मिळाल्या.

विदेशात अभिनेता झाला होता स्थायिक

२०११ साली त्याच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून करार करण्यात आला होता. पण ते थांबवण्यात आले. हा अभिनेता काही टीव्ही शोमध्ये अभिनय करायला गेला होता. अखेरीस, तो सिनेइंडस्ट्री सोडून न्यूझीलंडला गेला. अलीने तेथे काही वेगळीच काम केले आणि २०२३ मध्ये भारतात परतले. काही रिपोर्ट्सनुसार तो दिवाळखोर झाला आणि त्याने मेकॅनिक म्हणून काम केले किंवा उदरनिर्वाहासाठी शौचालये साफ केली. आतापर्यंत अभिनेत्याने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही.
 

Web Title: Aishwarya Rai's actor Mirza Abbas Ali stopped getting work, settled abroad; but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.