शाहरुख खानच्या मुलासोबत ऐश्वर्या रायच्या लेकीचा दमदार परफॉर्मन्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:48 IST2024-12-20T10:47:24+5:302024-12-20T10:48:48+5:30

अबराम असो वा आराध्या दोघेही आपल्या सेलिब्रिटी मॉम, डॅडपेक्षा कुठेही कमी नाहीयेत.

Aishwarya Rai's daughter's powerful performance with Shahrukh Khan's son, video goes viral | शाहरुख खानच्या मुलासोबत ऐश्वर्या रायच्या लेकीचा दमदार परफॉर्मन्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

शाहरुख खानच्या मुलासोबत ऐश्वर्या रायच्या लेकीचा दमदार परफॉर्मन्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहसंमेलन हा शाळेतील सर्वात आनंददायी आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम असतो. केवळ बच्चे कंपनीचं नाही तर त्यांचे पालकही या दिवशी कमालीचे उत्साही असतात. मग ते सामान्य पालक असो किंवा सेलिब्रिटी पालक.  १९ डिसेंबरला धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. या स्नेहसंमेलन सोहळ्यात आराध्या बच्चन आणि अबराम खान यांनी एकत्र ख्रिसमस या विषयावरील परफॉर्मन्स केला. त्याच्या या दमदार परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आराध्या बच्चन आणि अबराम खान यांना  प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाला ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन तसेच किंग खानच्या कुटुंबाने हजेरी लावली होती. स्टेजवर आराध्या लाल रंगाच्या ड्रेसममध्ये दिसली. तर अबराम पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होता. आराध्या बच्चन आणि अबराम खान यांचा परफॉर्मन्स पाहून ऐश्वर्या आणि शाहरुख हे उत्साही दिसून आलं. दोघेही आपल्या मुलांचा परफॉर्मन्स मोबाइलमध्ये रेकॉर्ड करताना पाहायला मिळाले. 


 आराध्या आणि अबराम यांच्या वयात फार अंतर नाही. आराध्या 13 वर्षांची आहे तर, अबराम 11 वर्षांचा आहे. व्हिडीओमध्ये आराध्या आणि अबराम यांच्यामध्ये असलेली मैत्री दिसून येत आहे. दोघेही शाळेच्या फन्क्शन्समध्ये एकत्र सहभागी होतात.  सध्या सर्वत्र आराध्या आणि अबराम यांच्या परफॉर्मन्सची चर्चा रंगली आहे. 


Web Title: Aishwarya Rai's daughter's powerful performance with Shahrukh Khan's son, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.