अजब सिंग की गजब कहानी चित्रपट होणार १६ जानेवारील प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 05:40 PM2016-12-19T17:40:47+5:302016-12-19T17:40:47+5:30

'अजब सिंग की गजब कहानी' हा हिंदी चित्रपट आय. आर. एस असलेल्या अजय सिंग यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ...

Ajab Singh Ki Khabar ki kab kab khina ki aapna ki aap 16th ai | अजब सिंग की गजब कहानी चित्रपट होणार १६ जानेवारील प्रदर्शित

अजब सिंग की गजब कहानी चित्रपट होणार १६ जानेवारील प्रदर्शित

googlenewsNext
'
;अजब सिंग की गजब कहानी' हा हिंदी चित्रपट आय. आर. एस असलेल्या अजय सिंग यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे. तो सध्या रांची येथे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असून भारतातील पहिल्या दहा आयकर अधिकाºयांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. हा चित्रपट सत्य घटनेवर व त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची  कथा एका गरीब शेतकरी कुटुंबातील अपंगत्व पदरी पडलेल्या व्यक्तीची म्हणजेच आय. आर. एस अजय सिंग यांची असून, त्यांनी जिद्दीने, चिकाटीने, ध्येर्याने आणि कष्टाने संघर्ष करून आपले करिअर कसे घडविले व एक यशस्वी आयआरएस अधिकारी कसे झाले, ची कथा आहे. अजय सिंग गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कारकिदीर्तील उत्तोमोत्तम कामाच्या रेकॉर्ड्समुळे त्यांचं नाव भारतातील आघाडीच्या दहा आयकर आयुक्तांमध्ये घेतलं जातं. सध्या ते रांची येथील आयकर आयुक्त पदावर कार्यरत आहेत.आय.आर.एस अजय सिंग यांच्या पदरी अपंगत्व असूनही ते आपल्या कर्तबगार व्यक्तिमत्वामुळे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. अशा व्यक्तीचा जीवनपट पाहण्यास मिळणं ही एक अभिमानाची बाब आहे. 'अजब सिंग की गजब कहानी' या चित्रपटात एकूण आठ गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. 'रहमानिया रे अल्लाह हु', 'खुदा तू सुन लें' यांसारख्या  उत्तोमोत्तम सदाबहार गाणी असून त्याच्याच बरोबरीने एक झणझणीत आयटम गाणे ही आहे. 'अजब सिंग की गजब कहानी' चित्रपटासंदभार्तील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या  चित्रपटातील आयआरएस अजय सिंग यांची भूमिका कोणताही फेम असलेला अभिनेता न साकारता ही भूमिका आयआरएस अजय सिंगजी स्वत: साकारली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक रिअल लाईफ हिरो चित्रपटात रील लाईफ मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. अशा या अद्भूत व्यक्तिमत्त्वावर आधारलेल्या जीवनपटाची कथा व दिग्दर्शन रिशी मिश्रा यांनी केलेले असून श्री बिनोद कुमारजी यांनी श्री त्रिवेणी फिल्म्स इंटरनॅशनल चा हा चित्रपट येत्या १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.   




Web Title: Ajab Singh Ki Khabar ki kab kab khina ki aapna ki aap 16th ai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.