२२ वर्षांनंतर येणार या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल, अजय देवगण करणार तामिळ डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:34 PM2018-08-07T19:34:46+5:302018-08-07T19:35:29+5:30
बॉलिवूडमध्ये अजयने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेच. आता साऊथ इंडस्ट्रीत अजय किती यशस्वी होतो, ते बघूया.
साऊथ सुपरस्टार कमल हासन सध्या आपल्या ‘विश्वरूपम2’ या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. आता कमल हासन यांच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल खास बातमी आहे. होय, १९९६ मध्ये आलेल्या कमल हासन यांच्या या ब्लॉकब्लस्टर चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. या चित्रपटाचे नाव काय तर ‘इंडियन’. अर्थात ही झाली अर्धी बातमी. कारण खरी बातमी आणखी पुढे आहे. होय, ‘इंडियन’च्या या सीक्वलमध्ये अभिनेता अजय देवगणही दिसण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण अलीकडे कमल हासन यांनी याबाबतचे संकेत दिले.
या सीक्वलमध्ये अजय देवगण असणार, असे मलाही सांगण्यात आले आहे, असे कमल यांनी सांगितले.
दिग्दर्शन शंकर ‘इंडियन2’चे दिग्दर्शन करतील. शंकर यांनीच ‘2.0’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘इंडियन2’ अद्याप प्री-प्रॉडक्शन टप्प्यावर आहे. लवकरच याचे शूटींग सुरू होईल असे कळतेय. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री नयनतारा दिसणार असल्याचीही खबर आहे.
१९९६ मध्ये आलेल्या ‘इंडियन’मध्ये कमल हासन आणि मनीषा कोईराला लीड रोलमध्ये होते. ‘इंडियन2’मध्येही कमल हासन दिसणार आहेत. अजय देवगण यात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल आणि हा चित्रपट अजयचा साऊथ इंडस्ट्रीतील डेब्यू सिनेमा असेल. बॉलिवूडमध्ये अजयने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेच. आता साऊथ इंडस्ट्रीत अजय किती यशस्वी होतो, ते बघूया.