​‘गोलमाल ४’ मध्ये दिसणार अजय देवगन-शाहरुख खानची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 02:25 PM2017-02-08T14:25:23+5:302017-02-08T19:55:23+5:30

बॉलिवूडचा एंटरटेनर म्हणून ओळख मिळविणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व सिंघम स्टार अजय देवगन ...

Ajay Devgan and Shahrukh Khan will appear in Golmaal 4 | ​‘गोलमाल ४’ मध्ये दिसणार अजय देवगन-शाहरुख खानची जोडी

​‘गोलमाल ४’ मध्ये दिसणार अजय देवगन-शाहरुख खानची जोडी

googlenewsNext
लिवूडचा एंटरटेनर म्हणून ओळख मिळविणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व सिंघम स्टार अजय देवगन एकत्र दिसू शकतात. अजय देवगन व शाहरुख खान यांनी अद्याप एकत्र काम केले नाही. मात्र शाहरुखसोबत अजयची पत्नी काजोलची जोडी हिट ठरली आहे. 

सध्या रोहित शेट्टी आपल्या आगामी ‘गोलमाल ४’च्या शूटिंग शेड्युल ठरविण्यात व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘गोलमाल ४’मध्ये अजय देवगन सोबत शाहरुख खान देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसू शकतो. रोहित शेट्टीने दोन्ही दिग्गज कलावंतासोबत काम केले आहे. रोहितने यापूर्वी शाहरुखसोबत दिलवाले व अजय देवगनसोबत सिंघम व गोलमाल फेंचायसीचे चित्रपट केले आहेत. आता त्याची इच्छा या दोन्ही अभिनेत्यांना एकत्र आणण्याची आहे. अशीही चर्चा आहे की, ‘गोलमाल ४’ची निर्मिती शाहरुख खानची रेड चिलीज एन्टरटेनमेंट करू शकते. 



असे सांगण्यात येते की दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटात शाहरुख खान व अजय देवगन काम करणार होते. मात्र अजय देवगनने हा चित्रपट सोडला होता. यामुळे त्याची भूमिका सलमान खानला देण्यात आली होती. आता जर दिग्दर्शक रोहित शेट्टीचा प्लॅन यशस्वी ठरला तर अजय देवगन व शाहरुख खान एकत्र दिसू शकतात. ही दोन्ही स्टार्सच्या फॅ नसाठी मोठी पर्वणी ठरू शकते. दरम्यान ‘गोलमाल ४’मध्ये तब्बू देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. खुद्द अजय देवगन याने तब्बूचे नाव रोहित शेट्टीला सुचविले होते. याशिवाय निल नितीन मुकेशही या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या लग्नानंतर तो ‘गोलमाल ४’च्या टीमला जॉईन करेल. 

Web Title: Ajay Devgan and Shahrukh Khan will appear in Golmaal 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.