‘तान्हाजी’ नॉनस्टॉप...! 46 दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:02 PM2020-02-25T15:02:17+5:302020-02-25T15:04:52+5:30

बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम

ajay devgan film Tanhaji: The Unsung Warrior nonstop business in week 7 set benchmark | ‘तान्हाजी’ नॉनस्टॉप...! 46 दिवसांत कमावले इतके कोटी

‘तान्हाजी’ नॉनस्टॉप...! 46 दिवसांत कमावले इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देया वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉक बस्टर म्हणून ‘तान्हाजी’ने नवा विक्रम नोंदवला.

अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या अदाकारीने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन 46 दिवस झालेत पण चित्रपटाची कमाई मात्र नॉनस्टॉप सुरु आहे. भारतात आत्तापर्यंत या सिनेमाने 276.92 कोटींचा बिझनेस केला आहे.
 ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी नुकतेच चित्रपटाच्या सातव्या आठवड्याच्या कमाईचे आकडे शेअर केलेत.  सातव्या आठवड्यातील गत शुक्रवारी ‘तान्हाजी’ने 52 लाखांची कमाई केली. शनिवारी 63 लाख आणि रविवारी 74 लाख रूपयांचा गल्ला जमवला. याचसोबत चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 276.90 कोटी रूपयांवर पोहोचला. 


 
जागतिक स्तरावरही ‘तान्हाजी’ने  विक्रम केला आहे. होय,   या सिनेमाने 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटींवर बिझनेस केला आहे. या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला आहे.  जानेवारीच्या दुस-या आठवड्यात ‘तान्हाजी’ रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. इतकी की, दरदिवशी या सिनेमाने सरासरी 50 ते 60 लाखांची कमाई केली.

या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉक बस्टर म्हणून ‘तान्हाजी’ने नवा विक्रम नोंदवला. ‘तान्हाजी’ पुढे गत दीड महिन्यांत रिलीज झालेल्या कुठल्याही सिनेमाचा टिकाव लागला नाही. छपाक, पंगा, जवानी जानेमन, मलंग, लव्ह आज कल असे अनेक चित्रपट आलेत आणि गेलेत. पण ‘तान्हाजी’ची जादू मात्र कायम राहिली.   पाचव्या आठवड्यात ‘मलंग’ आणि  ‘शिकारा’  या सिनेमासोबत ‘तान्हाजी’ची टक्कर झाली.  मात्र या दोन्ही सिनेमांनी  पहिल्याच आठवड्यात निराशा केली. त्यानंतर व्हॅलेन्टाईनच्या मुहूर्तावर रिलीज झालेला ‘लव्ह आज कल’ हा सिनेमाही कमाल दाखवू शकला नाही. पाठोपाठ आलेल्या साहजिकच ‘तान्हाजी’ची घोडदौड कायम राहिली. 

Web Title: ajay devgan film Tanhaji: The Unsung Warrior nonstop business in week 7 set benchmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.