Ajay Devgan: बॉलिवूडच्या ‘सिंघम’ला एका गोष्टीची वाटते प्रचंड भीती; सांगितला थरारक अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:14 AM2022-11-28T11:14:48+5:302022-11-28T11:15:24+5:30
Ajay Devgan: अजय देवगण हा बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. पण पडद्यावर जबरदस्त अॅक्शन करणारा हाच ‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये एका गोष्टीला प्रचंड घाबरतो...
अजय देवगण (Ajay Devgan) हा बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. पण पडद्यावर जबरदस्त अॅक्शन करणारा हाच ‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये एका गोष्टीला प्रचंड घाबरतो, हे तुम्हाला माहित आहे का? होय, बॉलिवूडचा ‘सिंघम’ एका गोष्टीची प्रचंड भिती वाटते ती गोष्ट म्हणजे लिफ्ट. अर्थात यामागे एक कारणही आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द अजयने याबद्दलचा खुलासा केला.
अजय देवगण नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. यावेळी त्यानं अनेक खुलासे केले. अर्थात कपिलनं मोठ्या चतुराईनं काही गोष्टी त्याच्याकडून काढून घेतल्या. गप्पांच्या ओघात आणि हसता हसता अजयनं लिफ्टबद्दल सांगून टाकलं. अनेकांना बाथरूममध्ये लॉक होऊ, अशी भीती वाटते. तुला अशी एखादी भीती वाटते का? असा प्रश्न कपिलने अजयला विचारला. यावर मला बाथरूममध्ये लॉक होऊ अशी भीती वाटत नाही. पण हो, मला लिफ्टची भीती वाटते. मला बंद, छोट्या जागा आवडत नाहीत. तिथे मला भिती वाटते. लिफ्टची मला आजही भीती वाटते. त्यामुळे मी लिफ्ट टाळतोच. मला त्यात ‘क्लॉस्ट्रोफोबिक ’ फील होतं, असं अजयने सांगितलं. यामागच्या कारणाचा खुलासाही त्याने केला.
काय होता तो एक प्रसंग...
लिफ्टची भीती का वाटते? या कारणाचा खुलासा अजयने केला. तो म्हणाला, ‘मी एकदा लिफ्ट होतो. तेव्हा लिफ्ट अचानक थांबली आणि तिसऱ्या चौथ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये येऊन जोरात आदळली. आम्ही जवळपास दीड तासांहून अधिक वेळ लिफ्टमध्ये अडकलो होतो. तेव्हापासून मी लिफ्टमध्ये गेल्यानंतर क्लॉस्ट्रोफोबिक फिल करतो. या घटनेनंतर मी लिफ्टनं जाणंच बंद केलं. मी लिफ्टचा वापर करत नाही. कितीही फ्लोर असो मी चालत जातो. मी आजही हे फॉलो करतोय. मी लिफ्ट ऐवजी चालत जातो...’
अजयचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा सध्या जबरदस्त कमाई करतोय. आत्तापर्यंत या सिनेमाने 100 कोटींवर कमाई केली आहे. अजयबरोबर सिनेमात तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना, इशिता दत्ता हे कलाकारही आहेत. दृश्यम 2हा मल्याळम दृश्य2 या सिनेमाचा रिमेक आहे.