गँगस्टर ते Action डायरेक्टर, असा होता अजय देवगणच्या वडिलांचा प्रवास, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:21 PM2023-12-21T17:21:39+5:302023-12-21T17:22:17+5:30

'कॉफी विद करण'मध्ये अजयला त्याच्याबद्दल आणि वडिलांबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले.

Ajay Devgan reveals father s journey from gangster to action director | गँगस्टर ते Action डायरेक्टर, असा होता अजय देवगणच्या वडिलांचा प्रवास, अभिनेत्याने केला खुलासा

गँगस्टर ते Action डायरेक्टर, असा होता अजय देवगणच्या वडिलांचा प्रवास, अभिनेत्याने केला खुलासा

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) नुकताच 'कॉफी विद करण' (Koffee With Karan) या शोमध्ये सहभागी झाला होता. सोबतच दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही सहभाग घेतला. यावेळी त्याने प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यावर दिलखुलास संवाद साधला. अजयचे वडील वीरु देवगण (Veeru Devgn) हे प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर होते. पण मुंबईत असताना ते गँगस्टर्सच्या ग्रुपमध्ये होते असा खुलासा अजयने केला आहे.

'कॉफी विद करण'मध्ये अजयला त्याच्याबद्दल आणि वडिलांबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तो म्हणाला,'बाबांनी खूप कमी वयात पंजाब सोडलं आणि ते मुंबईला आले. तेव्हा पैशांचीही चणचण होती. दोन वेळचं जेवायलाही पैसे नव्हते. नंतर त्यांनी कारपेंटरचं काम शिकून घेतलं. दरम्यान तेव्हाच ते सायन कोळीवाडामधील एका गँगस्टरच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले.'

तो पुढे म्हणाला,'एक दिवस प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर रवि खन्ना जात असताना त्यांनी वडिलांना मारामारी करताना पाहिलं. तेव्हा रवि खन्ना यांनी वडिलांना तू काय करतोस? असे विचारले. वडील म्हणाले,कारपेंटर आहे. तर रवि खन्ना यांनी तू चांगली मारामारी करतोस उद्या मला येऊन भेट असे सांगितले. तिथून वडिलांचा अॅक्शन डायरेक्टर बनण्याचा प्रवास सुरु झाला.'

वीरु देवगण यांनी अनेक सिनेमांमध्ये अॅक्शन दिग्दर्शनाचे काम केले आहे. प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर्समध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. 'रोटी कपडा और मकान','मिस्टर नटवरलाल','फूल और काँटे' या सिनेमांचा त्यात समावेश आहे. 

Web Title: Ajay Devgan reveals father s journey from gangster to action director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.