अजय देवगणने प्रोसेनजीत चॅटर्जीच्या 'दशम अवतार'चा पोस्टर केला शेअर, सिनेमाला दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 06:05 PM2023-10-14T18:05:24+5:302023-10-14T18:05:40+5:30
Ajay Devgan : बॉलिवूडचा सिंघम उर्फ अभिनेता अजय देवगणने प्रोसेनजीत चॅटर्जीच्या 'दशम अवतार' चित्रपटाचे पोस्टर लाँच केले आहे, जे व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी 'मैदान' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, अभिनेता अनेक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांचा भाग आहे. अजय कधीकधी काही प्रोजेक्ट्सचे प्रमोशनही करतो. अलीकडेच अभिनेत्याने प्रोसेनजीत चॅटर्जीच्या 'दशम अवतार' चित्रपटाचे पोस्टर लाँच केले आहे, जे व्हायरल होत आहे.
दुर्गापूजेच्या शुभ प्रसंगी, अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एका बंगाली चित्रपटाचे कौतुक केले. 'दशम अवतार' नावाच्या या चित्रपटात बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जी मुख्य भूमिकेत आहे आणि १९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने लिहिले, 'शुभो महालय! सादर करत आहोत 'दशम अवतार' मूळ बंगाली कॉप युनिव्हर्स! सिंगमकडून प्रोबीरला शुभेच्छा. १९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बंगाली कॉप युनिव्हर्स दिसणार चित्रपटात
या चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, जिशू सेनगुप्ता आणि जावा अहसान यांच्या भूमिका आहेत आणि सृजित मुखर्जी दिग्दर्शित आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात भगवान विष्णूचे दहा अवतार पाहायला मिळणार असल्याचेही वृत्त आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट करत प्रोसेनजीत चॅटर्जीला शुभेच्छा दिल्या आहेत.
'सिंघम अगेन'ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
अजय देवगणबद्दल सांगायचे तर, लोक बर्याच दिवसांपासून सिंघम अगेनची वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स या चित्रपटांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे, त्यामुळेच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अजय सिंघमच्या भूमिकेत, रणवीर सिंग सिम्बाच्या भूमिकेत आणि अक्षय कुमार सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात महिला पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पदुकोणचीही निवड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांचाही समावेश असेल.