अजय देवगणने 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:58 PM2018-09-25T16:58:13+5:302018-09-25T16:59:56+5:30

अभिनेता अजय देवगणने आगामी बहुचर्चित चित्रपट 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे

Ajay Devgan starts shooting for 'Tanaji-The Unsung Warrior' | अजय देवगणने 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या शूटिंगला केली सुरूवात

अजय देवगणने 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या शूटिंगला केली सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देअजय देवगण दिसणार तानाजींच्या भूमिकेत 'तानाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट 29 नोव्हेंबर, 2019ला होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणने आगामी बहुचर्चित चित्रपट 'तानाजी-द अनसंग वॉरियर'च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. अजय देवगणने या चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

अजय देवगणने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत ओम राऊतसोबत अजय प्रार्थना करताना दिसतो आहे. या चित्रपटात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. 'तानाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट 29 नोव्हेंबर, 2019ला प्रदर्शित होणार आहे.


यासिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतोय. अजय देवगण यात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. 
अजयला तानाजीच्या भूमिकेत पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. यात अजय एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वत: अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते. अजय देवगणला तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Ajay Devgan starts shooting for 'Tanaji-The Unsung Warrior'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.