अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:51 PM2024-07-05T12:51:44+5:302024-07-05T12:52:03+5:30

अजय देवगण-तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलीय (auron mein kaha dum tha, ajay devgn, tabu)

Ajay Devgan Tabu starrer auron mein kaha dum tha new release date | अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक?

अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक?

अजय देवगण-तब्बू यांच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या टिझर, ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. अशातच दोन दिवसांवर रिलीज असतानाच काही दिवसांपूर्वी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची चर्चा झाली. त्यामुळे अजय-तब्बूच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. पण नुकतंच या सिनेमाची नवी रिलीज डेट पुढे आलीय.

औरों में कहा दम था सिनेमाची नवी रिलीज डेट

'औरों में कहाँ दम था' या रोमान्स थ्रिलर चित्रपटाबाबत प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार निर्माते हा सिनेमा २ ऑगस्टला प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. अजूनतरी निर्मात्यांनी सिनेमाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार निर्माते २ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज करण्यासाठी तयार आहेत. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

'औरो में कहा दम था'चं प्रदर्शन थांबवलं. निर्माते म्हणतात..

'औरो में कहा दम था' सिनेमा ५ जुलैला रिलीज होणार होता. दोन दिवसांवर रिलीज असताना सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय. याविषयी सिनेमाच्या टीमने एक खास पोस्ट शेअर करुन याविषयी खुलासा केलाय. निर्माते म्हणतात, "'प्रिय मित्रांनो प्रदर्शक आणि वितरक यांनी केलेल्या विनंतीवरून, आम्ही एकत्रितपणे आमच्या 'और में कहां दम था' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल." त्यामुळे अजय आणि तब्बूचा हा दहावा एकत्रित चित्रपट खरंच २ ऑगस्टला रिलीज होणार का, यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Ajay Devgan Tabu starrer auron mein kaha dum tha new release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.