फोटो काढायच्या वेळेस अजय देवगणला काजोलने काढला चिमटा! नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:35 IST2024-10-11T15:34:32+5:302024-10-11T15:35:17+5:30
फोटो काढायच्या वेळेस काजोलने अजय देवगणला चिमटा का काढला? व्हिडीओही झालाय व्हायरल (kajol, ajay devgn)

फोटो काढायच्या वेळेस अजय देवगणला काजोलने काढला चिमटा! नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
सध्या नवरात्रीचा माहोल सुरु आहे. अशातच राणी मुखर्जी-काजोलने आयोजित केलेल्या दुर्गापूजेची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या दुर्गापूजेत सहभागी होण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात. काजोल-राणी मुखर्जी मनोभावे देवीची आराधना करुन पूजा करतात. या दुर्गापूजेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जेव्हा फोटोसाठी उभ्या असलेल्या अजय देवगणला काजोल चिमटा काढते. काय घडलं नेमकं?
म्हणून काजोलने अजयला काढला चिमटा?
विरल भयानीने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत दिसतं काजोलच्या बाजूला अजय देवगण उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांचा लाडका लेक फोटोसाठी पोज देताना दिसतो. यावेळी अजयने एक हात मुलाच्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. तर अजयचा दुसरा हात खालीच असतो. त्यावेळी काजोल त्याला दोन-तीनवेळा चिमटा काढताना दिसते. बायकोला काय म्हणायचंय हे अजयला समजतं. त्यामुळे तो खाली असलेला दुसरा हात बायकोच्या खांद्यावर ठेऊन फोटोसाठी पोज देतो. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून अनेक जण या व्हिडीओखाली भन्नाट कमेंट्स करत आहेत.
अजय-काजोलचं वर्कफ्रंट
अजय देवगण आणि काजोल या पती-पत्नीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, काजोलची भूमिका असलेला 'दोन पत्ती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात काजोलसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगणच्या आगामी 'सिंघम अगेन'ची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. १ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.