अजय देवगण आता फुटबॉल कोच बनणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:47 AM2018-07-13T10:47:58+5:302018-07-13T10:51:09+5:30
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नुकतीच ट्विटर तो चाणक्यची बायोपिकची घोषणा केली आहे. त्यानंतर अजय आणखीन एक बायोपिकमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळतेय.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नुकतीच ट्विटर तो चाणक्यची बायोपिकची घोषणा केली आहे. त्यानंतर अजय आणखीन एक बायोपिकमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळतेय. अजय महान फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
अब्दुल रहीम जेव्हा भारतीय फुटबॉल संघाचे कोच होते तो काळ फुटबॉलचा सुर्वणकाळ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय टीम 1956 साली पहिल्यांदा मेलबर्नमध्ये झालेल्या ऑलिम्पिंकमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनागुप्ता मिळून करतायेत. बोनी कपूर म्हणाले, जेव्हा आकाश आणि जॉय माझ्याकडे कथा घेऊन आले तेव्हा मला आश्चर्य वाटले की या व्यक्तिबाबत लोकांना काहीच माहिती नाही. मला वाटते की गोष्ट लोकांनापर्यंत पोहोचली पाहिजे आणि अजय देवगण या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकतो.
चाणक्य आणि सैय्यद यांच्या बायोपिकशिवाय अजय रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे तर अजय आणि रणवीर यात एक स्पेशल अॅक्शन सीक्वेंस असणार आहे. सारा अली खान आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल. अजय देवगणने काही दिवसांपूर्वी आलेल्या 'रेड' सिनेमात इनक्म टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो आता मोठ्या पडद्यावर बायोपिक करताना दिसणार आहे.