अजय देवगण चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘या’ साउथ अभिनेत्रीसोबत करणार काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:01 PM2017-12-03T15:01:11+5:302017-12-03T20:31:11+5:30
२०१३ मध्ये दिग्दर्शक साजिद खान याने ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ...
२ १३ मध्ये दिग्दर्शक साजिद खान याने ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया या जोडीला एकत्र आणले होते. या चित्रपटाबद्दल सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. असे म्हटले जात होते की, ‘हिम्मतवाला’ बॉक्स आॅफिसवर इतिहास लिहिणार, परंतु तसे काही घडले नाही. कारण हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. त्याचबरोबर अजय-तमन्नाला यशस्वी चित्रपटाचा किताबही मिळाला नाही. त्यानंतर प्रत्येकाने असा विचार केला की, पुन्हा एकदा ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार नाही. मात्र आता ही बातमी येत आहे की, पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करताना बघावयास मिळणार आहे.
वृत्तानुसार अजय आणि तमन्ना २०१४ मध्ये रिलीज झालेल्या नॅशनल अवॉर्ड विजेत्या ‘जिगरथंडा’ या तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र काम करणार आहेत. मात्र यामध्ये एक ट्विस्ट असून, अजय या चित्रपटात तमन्नाचा हिरो म्हणून नव्हे तर चित्रपटाला प्रोड्युस करण्याचे काम करणार आहे, तर चित्रपटात तमन्नासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि संजय दत्त दिसणार आहेत. या चित्रपटाला निशिकांत कामत दिग्दर्शित करणार आहेत. निशिकांत यांनी अजय देवगणचा सुपरहिट ‘दृश्यम’चे दिग्दर्शन केले आहे.
असे म्हटले जात आहे की, तमन्ना या चित्रपटाच्या शूटिंगला ‘क्वीन’ रीमेकची शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुरुवात करणार आहे. ‘जिगरथंडा’च्या स्टोरी लाइनला बॉलिवूड टच देऊन हिंदी भाषिक प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. ‘जिगरथंडा’ या चित्रपटाच्या कथेचा सेट मदुरई येथे उभारण्यात आला होता, तर हिंदी रिमेकच्या कथेत याचा सेट महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. अजय देवगणविषयी सांगायचे झाल्यास तो सध्या राजकुमार गुप्ता यांच्या ‘रेड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत इलियान डिक्रूज पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण एका इनकम टॅक्स आॅफिसरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ मार्च २०१८ रोजी रिलीज होणार आहे.