बॉलिवूडने रिहानाला सुनावले; वाचा, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:32 PM2021-02-04T14:32:18+5:302021-02-04T14:37:26+5:30
Farmer protest : रिहानाच्या ट्वीटनंतर...
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले आणि या मुद्यावरून अख्खा देश ढवळून निघाला. रिहानाने आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया दिल्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झालेत. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले.
फूट पाडू पाहणा-याकडे लक्ष देऊ नका
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether#IndiaAgainstPropagandahttps://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
अभिनेता अक्षय कुमार विदेश मंत्रालयाच्या ट्वीटला रिट्वीट करत शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सरकारची बाजू उचलून धरली. ‘शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. फूट पाडू पाहणा-या प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा एका सौहार्दपूर्ण संकल्प करा,’ अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले.
कोणत्याही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका
Don’t fall for any false propaganda against India or Indian policies. Its important to stand united at this hour w/o any infighting 🙏🏼#IndiaTogether#IndiaAgainstPropaganda
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 3, 2021
अजय देवगनने शेतकरी आंदोलन आणि रिहानाच्या ट्वीट च्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले. ‘भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध सुरु असलेल्या कोणत्याही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांची एकजूट महत्त्वाची आहे, ’ असे ट्वीट त्याने केले.
अर्धवट सत्य...
We must always take a comprehensive view of things, as there is nothing more dangerous than half truth. #IndiaTogether#IndiaAgainstPropaganda@hiteshjain33https://t.co/7rNZ683ZAU
— Suniel Shetty (@SunielVShetty) February 3, 2021
‘अर्धवट सत्य या पेक्षा कोणतीही गोष्ट वाईट नसते. म्हणून, कोणत्याही गोष्टीचा विचार सर्व बाजूने विचार केला पाहिजे, या आशयाचे ट्वीट अभिनेता सुनील शेट्टी याने केले.
विवेक आणि संयमाची गरज
We live in turbulent times and the need of the hour is prudence and patience at every turn. Let us together, make every effort we can to find solutions that work for everyone—our farmers are the backbone of India. Let us not let anyone divide us. #IndiaTogether
— Karan Johar (@karanjohar) February 3, 2021
दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनेही या मुद्यावर ट्वीट केले. ‘आपण संध्या अशांत काळात जगतोय. अशावेळी प्रत्येक वळणावर विवेक आणि संयमाची गरज आहे. आपला शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. कोणालाही आपल्यात फूट पाडू देता कामा नये,’ असे ट्वीट त्याने केले.
आम्ही सहन करणार नाही...
बढ़ते वर्चस्व को देख भारत विरोधी किसी भी हद तक गिर रहे. Even in this sad phase of pandemic,India is helping all nations with vaccine supply for the sake of Humanity.Let all realise that India is ONE & will not tolerate comments against it. #IndiaTogether#IndiaAgainstPropaganda
— Kailash Kher (@Kailashkher) February 3, 2021
गायक कैलाश खेर याने ट्वीट करत लिहिले, ‘भारत एकसंघ आहे आणि भारताविरोधातील कारवाया आम्ही सहन करणार नाही, ’ असे त्याने लिहिले आहे.
PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण?
काय म्हणाली रिहाना?
why aren’t we talking about this?! #FarmersProtesthttps://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवरून केला होता. तिच्या या ट्विटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. ट्विटरवरून गेल्या 24 तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे.
अभी मजा आयेगा ना बिंदू...! रिहानाच्या ट्विटनंतर कंगना राणौत झाली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस