तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:58 AM2018-11-27T11:58:41+5:302018-11-27T11:59:44+5:30
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही.
ठळक मुद्देहोय, करणच्या एका प्रश्नावर अजयने पत्नी काजोलबदद्ल अशी काही प्रतिक्रिया दिली की, काजोल चांगलीच चिडली. तिला असे चिडलेले पाहून अजय आणि करणचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. होय, अलीकडे अजय व काजोलने या शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, एकमेकांना चिडवणे, खिजवणे अशी धम्माल मस्ती रंगली.
होय, करणच्या एका प्रश्नावर अजयने पत्नी काजोलबदद्ल अशी काही प्रतिक्रिया दिली की, काजोल चांगलीच चिडली. तिला असे चिडलेले पाहून अजय आणि करणचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. काजोलच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याच्या अलीकडच्या सवयीवर अजय यावेळी बोलला. ‘काजोलने फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर मला काहीही अडचण नाही. अडचण आहे ती, फोटो काढल्यानंतर तीन तास ते एडिट करण्याबद्दल. काजोल फोटो काढते अन् पुढचे तीन तास ते एडिट करत बसते. कारण ते सोशल मीडियावर पोस्ट करायचे असतात. काजोलला याआधी असे करताना मी कधीही बघितले नाही. पण आता म्हातारपणी तिला काय सुचतयं, माहित नाही,’ असे अजय म्हणाला. अजयने म्हातारपणं म्हणायची देर की, काजोल चांगलीच भडकली. मग काय, म्हातारपण तुझे, माझे नाही, असे ती म्हणाली. अजय व करण यावर आपले हसू रोखू शकले नाहीत.
यानंतर करणने अजयला त्याच्या व काजोलच्या लग्नाची तारिख विचारली. पण हे काय? यावर अजय गोंधळला. २३ फेब्रुवारी अशी तारीख त्याने सांगितली. हे ऐकून काजोलला धक्काचं बसला आणि ती आणखी चिडली. २३ नाही,२४ फेब्रुवारी, १९९९ असे तिने सांगितले.
एकंदर काय तर काजोलला डिवचण्याची संधी अजयने यावेळी साधली अन् त्याने ती कॅशही केली.