भारतीय लष्कराचा पराक्रम अजय देवगण जगाला दाखवणार; गलवानच्या शहिदांना सिनेमातून 'सॅल्यूट' करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:40 PM2020-07-04T14:40:45+5:302020-07-04T14:40:45+5:30

अजय देवगण या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

Ajay devgn film on galwan valley clash the story of sacrifice of 20 indian army men who fought chinese army | भारतीय लष्कराचा पराक्रम अजय देवगण जगाला दाखवणार; गलवानच्या शहिदांना सिनेमातून 'सॅल्यूट' करणार

भारतीय लष्कराचा पराक्रम अजय देवगण जगाला दाखवणार; गलवानच्या शहिदांना सिनेमातून 'सॅल्यूट' करणार

googlenewsNext

अभिनेता अजय देवगण लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यामध्ये झालेल्या झटापटीवर चित्रपट तयार करणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात चिनी सैन्यासह लढताना शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या बलिदानाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे नाव व कास्ट निश्चित होणे अजून बाकी आहे. अजय देवगण या सिनेमाची निर्मिती करणार आहे मात्र यात तो काम करणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही.

फिल्म अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीटवरुन ही माहिती दिली आहे. ट्विटरवर त्यांनी लिहिले, अजय देवगण गलवान घाटी झालेल्या चकमकीवर सिनेमा तयार करणार आहे. सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. चिनी सैन्याशी लढताना  20 भारतीय जवानाने वीरमरण आले त्यांच्यावर हा सिनेमात तयार करण्यात येणार आहे. सिनेमाची स्टारकास्ट अजून फायनल झालेली नाही. 

या सिनेमाची निर्मिती अजय देवगणची एफफिल्म्स आणि सेलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी प्रॉडक्शन कंपनी करणार आहे. 15 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैन्य सोबत भारतीय जवनांनामध्ये  हिंसक झटापट झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल तर  'भुजः द प्राइड ऑफ इंडिया' हा अजय देवगणचा सिनेमा OTT वर रिलीज होणार आहे तर मैदान हा सिनेमा 13 ऑगस्ट 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Ajay devgn film on galwan valley clash the story of sacrifice of 20 indian army men who fought chinese army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.