मान गये सिंघम! अजय देवगणने उभारले 1 कोटी, कोरोना रूग्णांसाठी होणार ICU बेड्सची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:50 PM2021-04-28T15:50:33+5:302021-04-28T15:52:43+5:30
देशात कोरोनाचा जोर, लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला बॉलिवूडचा ‘सिंघम’
देशात कोरोनाचा जोर वाढला आहे. लोक हतबल झाले आहेत. रूग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, औषधांचा तुटवडा भासतोय. एकंदर स्थिती भीषण आहेत. या भीषण संकटकाळात मदतीचे अनेक हात समोर येत आहेत, हीच तेवढी समाधानाची बाब आहे. आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अजय देवगण (Ajay devgn) लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
अजय काही लोकांना सोबत घेऊन बीएमसीच्या मदतीने कोरोना रूग्णांसाठी एक इमर्जन्सी युनिट उभारत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क भागात भारत स्काऊट्स अॅण्ड गाइड्स हॉलला 20 बेडच्या कोव्हिड 19 युनिटचे स्वरूप देण्यात येणार आहे. या ठिकाणी कोव्हिड रूग्णांसाठी व्हेंटिलेटर, पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन अशा सगळ्या सोयी मिळू शकतील.
अजयने आनंद पंडित, बोनी कपूर, लव रंजन, रजनीश खनूजा, लीना यादव, आशिम बजाजा, समीर नायक, दीपक धर, तरूण राठी, आरपी यादव अशा सर्वांच्या सहकार्याने या युनिटसाठी 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम उभारली आहे.
गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली असताना अजयने धारावी भागात व्हेंटिलेटर्स दान केले होते.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच अजय ओटीटीवर डिजीटल डेब्यू करतोय. रूद्र-द एज आॅफ डार्कनेस या सीरिजमध्ये तो दिसणार आहे. ही वेबसीरिज डिज्नीप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याने अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.