माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:23 PM2023-03-30T12:23:25+5:302023-03-30T12:27:04+5:30

'भोला'च्या प्रदर्शनापूर्वी अजय देवगणने ट्वविटरवर चाहत्यांशी संवाद साधला.

ajay devgn gives hillarious reply to a fan who asked him to sponser ticket of bholaa due to month end | माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर

माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर

googlenewsNext

अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) 'भोला' (Bholaa) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. फिल्मच्या पहिल्या पोस्टर रिलीजपासूनच त्याची उत्सुकता वाढली होती.  रामनवमीच्या मुहुर्तावर फिल्म रिलीज झाली आहे. यामध्ये अजय आणि तब्बूची (Tabu) जोडी आहे. सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंगमध्येच तुफान प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली होती.

'भोला'च्या प्रदर्शनापूर्वी अजय देवगणने ट्वविटरवर चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. काही चाहत्यांनी अजय गंमतीत फिरकी घेतली तर अजयनेही भन्नाट उत्तरं देत चाहत्यांना प्रतिसाद दिला. दरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नावर अजयचं उत्तर लक्ष वेधून घेणारं आहे. अजयचा 'भोला' सिनेमा आज ३० तारखेला म्हणजेच month end ला रिलीज झाल्याने चाहत्याने विचारलं, 'सर तिकीट स्पॉन्सर करा ना month end सुरु आहे.'

चाहत्याच्या या ट्वीटवर अजयचं उत्तर तर फारच मजेशीर आहे. अजयने ट्ववीट करत लिहिले, 'माझाही.' आणि पुढे लाजणारे इमोजी दिले.

आणखी एका चाहत्याने ट्वीट केले,'सर प्लेन उडवायला जास्त मजा येते की बाईक उडवायला?'

यावर अजय म्हणतो, 'लोकांना उडवायला'.

'भोला' चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला होता त्यात साऊथ स्टार कार्थी मुख्य भूमिकेत होता. २५ कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कैथी’ने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा बिझनेस केला होता. आता याचाच रिमेक असलेला अजयचा ‘भोला’ किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: ajay devgn gives hillarious reply to a fan who asked him to sponser ticket of bholaa due to month end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.