अखेर ठरलं! अजय देवगणच्या 'मैदान'ला ४ वर्षांनी मुहुर्त मिळाला, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:22 IST2024-03-05T18:21:59+5:302024-03-05T18:22:43+5:30
'शैतान'नंतर अजय देवगणचा 'मैदान' बॉक्स ऑफिस गाजवणार! 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

अखेर ठरलं! अजय देवगणच्या 'मैदान'ला ४ वर्षांनी मुहुर्त मिळाला, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या 'मैदान' सिनेमाची प्रेक्षक गेली कित्येक दिवस वाट पाहत आहेत. आता अजय देवगणच्या या बहुप्रतीक्षित 'मैदान' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
अजय देवगणच्या 'मैदान' या सिनेमाचं पहिलं पोस्टर २०२०मध्ये शेअर करण्यात आलं होतं. तेव्हा २०२०च्या नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, काही कारणांमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर २०२३च्या जूनमध्ये मैदान रिलीज होण्याच्या चर्चा होत्या. पण, काही कारणांमुळे या सिनेमाला विलंब होत होता. आता अखेर जवळपास ४ वर्षांनी या सिनेमाला मुहुर्त मिळाला आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहुर्तावर अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'मैदान' सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सैय्यद अब्दुल रहीम यांची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. अमित शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अजय देवगणबरोबर प्रियमणि, गजराज राव आणि रुद्रनील घोष यांचीही भूमिका आहे.
“Badlav lane ke liye ek akela bhi kafi hota hai”#Maidaan@Priyamani6@raogajraj@boneykapoor@iAmitRSharma@freshlimefilms@saiwynQ@actorrudranil@writish@saregamaglobal@zeestudios_@zeestudiosint@BayViewProjOffl@MaidaanOfficialpic.twitter.com/YQTMPCaVXR
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 30, 2020
अजय देवगणच्या मैदानबरोबरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेला 'बड़े मियां छोटा मियां' हा सिनेमादेखील ईदच्या दिवशीच प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमांची टक्कर होण्याची शक्यता आहे.