प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:08 IST2025-01-06T17:01:43+5:302025-01-06T17:08:53+5:30

अजय देवगणचा भाचा आणि रवीना टंडनची लेक आझाद सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत (ajay devgn, azaad)

Ajay Devgn movie Azaad trailer starring ajay devgn amaan devgn rasha thadani | प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडनची लेक राथा थडानी यांच्या आगामी 'आझाद' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच 'आझाद'ची उत्सुकता शिगेला आहे. अशातच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आझाद'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. सुशांत सिंग राजपूतला ज्यांनी बॉलिवूडमध्ये आणलं अशा अभिषेक कपूर यांनी 'आझाद'चं दिग्दर्शन केलंय. काय आहे 'आझाद'च्या ट्रेलरमध्ये?

'आझाद'च्या ट्रेलरमध्ये काय?

'आझाद'च्या ट्रेलरमध्ये एका कुशल घोडेस्वाराची कहाणी दिसते. या घोडेस्वाराची भूमिका अजय देवगणने केली आहे. अजय देवगण क्रूर ब्रिटीश सेनेच्या तावडीतून स्वतःची सुटका करतो. या ट्रेलरमध्ये ट्विस्ट तेव्हा दिसतो जेव्हा एक घोडा बेपत्ता होतो. हा घोडा अमनला  भेटतो. अमन त्या घोड्याची देखभाल करते. दुसरीकडे अजय देवगण त्याच्या हरवलेल्या घोड्याला शोधण्यासाठी जीवाचं रान करताना दिसतो. मग पुढे काय होतं? याची कहाणी 'आझाद'मध्ये बघायला मिळते. ट्रेलरमध्ये रवीना टंडनची मुलगी राशाच्या अभिनयाचीही झलक दिसते.


कधी रिलीज होणार 'आझाद'?

२०२४ मध्ये 'सिंघम अगेन', 'शैतान' सारख्या सिनेमांमध्ये काम केल्यावर अजय देवगणचा नवीन वर्षातील हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात अजयचा पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. याशिवाय डायना पेंटी, पियुश मिश्रा या कलाकारांचीही सिनेमात खास भूमिका आहे. १७ जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Web Title: Ajay Devgn movie Azaad trailer starring ajay devgn amaan devgn rasha thadani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.