अजय देवगनच्या ऑनस्क्रीन लेकीनं बाळाच्या जन्माआधी नव्या घरात केला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:28 IST2023-05-30T13:25:40+5:302023-05-30T13:28:24+5:30
'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे, याआधी तिने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

अजय देवगनच्या ऑनस्क्रीन लेकीनं बाळाच्या जन्माआधी नव्या घरात केला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांच्याकडे लवकरच छोटा पाहुण्याचं आगमन आहे. या अभिनेत्रीतं अलीकडेच बेबी शॉवर झालं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दुसरीकडे, इशिता आणि वत्सल सेठ त्यांच्या बाळाच्या जगात येण्यापूर्वी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. इशिता दत्तानेही नुकतेच तिचे नवीन घर घेतलं आहे. घराच्या गृहप्रवेश पूजेच्या व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
व्हिडीओत अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर नवीन घर घेतल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. इशिताचं हे नवीन घर जुहू सर्कलच्या जवळ आहे. तिचा हा फ्लॅट तीन बीएचकेचा आहे. वत्सलला अनेक वर्षांपासून मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे होते, आता त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे इशिताने सांगितले होतं.
इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नापूर्वी इशिता आणि वत्सल दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे कपल आई-वडील होणार आहेत. यामुळेच या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसत आहेत. इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्हीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. इशिता 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.