​अजय देवगन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 06:18 PM2016-12-25T18:18:31+5:302016-12-25T18:18:31+5:30

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन त्याच्या आगामी चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एका सुपरहिट ...

Ajay Devgn plays the role of blind person | ​अजय देवगन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका

​अजय देवगन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका

googlenewsNext
ong>बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन त्याच्या आगामी चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एका सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असणार आहे. अजय देवगन याने ‘सिंघम’ व ‘दृष्यम’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केले आहे. त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक प्रियदर्शन व अजय देवगन लकवरच एका प्रोजेक्टवर काम करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अजय देवगन महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येते. ही भूमिका एका अंध व्यक्तीची असेल. यात अजय अंध लिफ्ट मॅनची भूमिका साकारणार आहे. हा मळ्याळम चित्रपट ‘ओप्पम’चा रिमेक असेल असे सांगण्यात येते. ‘ओप्पम’मध्ये ही भूमिका मोहनलाल यांनी साकारली होती. यापूर्वी देखील अजय देवगन याने मोहनलाल यांच्या दृश्यमच्या रिमेकमध्ये त्याचीच भूमिका केली होती. दृश्यममधील अजयच्या भूमिकेची प्रशंसा करण्यात आली होती. 

या नव्या प्रोजेक्टवर सध्या प्रियदर्शन व अजय देवगन यांच्यात चर्चा सुरू आहे. यापूर्वी दोघांनी आक्र ोश व तेज या चित्रपटात एकत्र काम केले आहे. नव्या पिढीतील नायकांत अक्षय कुमार याने आखे व हृतिक रोशन यांनी अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट अ‍ॅक्शनपट होते. 

यावर्षी अजय देवगनचा ‘शिवाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याने बॉक्स आॅफिसवर १०० कोटींची कमाई केली. अजय देवगन सध्या रोहित शेट्टीसोबत गोलमान ४चे चित्रीकरण करीत असून पुढील वर्षी दिवाळीत त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रियदर्शनच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा जुळविता येणार येतील असेही सांगण्यात येत आहे. 

Web Title: Ajay Devgn plays the role of blind person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.