अजय देवगणच्या 'RAID 2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर, रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:40 AM2024-12-04T10:40:59+5:302024-12-04T10:41:34+5:30
१५ नोव्हेंबरला अजय देवगणचा 'RAID 2' प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
अजय देवगण त्याच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'सिंघम अगेन'नंतर आता अजय देवगण 'RAID 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'RAID' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा सिनेमा आणि त्यातील अजय देवगणची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित होत आहे.
'RAID' नंतर 'RAID 2'च्या प्रतिक्षेत चाहते होते. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर २०२४च्या नोव्हेंबर महिन्यातच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार होता. मात्र काही कारणांमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. १५ नोव्हेंबरला अजय देवगणचा 'RAID 2' प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
अभिषेक पाठकचं दिग्दर्शन असलेला 'RAID 2' सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अजय देवगणच्या सिनेमाचा महाराष्ट्र दिनाचा मुहुर्त गाठत १ मे २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल अपडेट दिली आहे.
'RAID' मध्ये अजय देनगणने IRS ऑफिसर अमेय पटनाईक यांची भूमिका साकारली होती. १९८० साली सरदार इंजर सिंग या व्यावसायिकाच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीवर आधारित हा सिनेमा होता. आता पुन्हा एकदा छापेमारीचा हा थरार 'RAID 2'मध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.