अजय देवगणचा खुलासा, ‘लोक म्हणायचे तुझ्यात हिरोसारखे गुण नाहीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 01:18 PM2018-03-20T13:18:35+5:302018-03-20T18:48:35+5:30
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण अजूनही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवित आहे. जवळपास दोन दशकांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये ...
ब लिवूडचा सिंघम अजय देवगण अजूनही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवित आहे. जवळपास दोन दशकांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये अजयने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. ‘विजयपथ’ या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटात अजयने अशीच काहीशी अविस्मरणीय भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटात अजय अतिशय दमदार भूमिकेत असून, त्याचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
दरम्यान, आज आम्ही अजयच्या फिल्मी करिअरबद्दल सांगणार आहोत. ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राणी मुखर्जीकडे त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. राणीने इंडस्ट्रीमधील बºयाचशा स्टारची भेट घेत त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत खडतर क्षणाबद्दल विचारले. शाहरूख खान, कॅटरिना कैफ यांसारख्या अनेक स्टार्सनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत असे काही खुलासे जे प्रेक्षकांना माहीत नव्हते. यादरम्यान अजयनेही त्याच्या आयुष्याशी निगडीत अशाच एका क्षणाचा खुलासा केला, जो कदाचित इतरांना माहिती नाही.
अजयने सांगितले की, जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपटाची शूटिंग करीत होतो तेव्हा इंडस्ट्रीतील बºयाचशा लोकांनी म्हटले होते की, हा मुलगा सर्वसामान्यांप्रमाणे दिसतो. याच्यात हीरो बनण्यासारखे काही गुण नाहीत. त्यामुळे हा कधीच हीरो बनू शकणार नाही. यावेळी मी सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. मात्र या प्रतिक्रियांचा कधी स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही. यावेळी अजय देवगणने लोकांना आपल्या कमजोरीला आपली ताकद बनविण्याची रिकवेस्ट केली.
दरम्यान, राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा हा चित्रपट २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, ती बॉलिवूड स्टार्सच्या भेटी घेऊन त्यांच्या आयुष्यातील खडतर क्षणाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रपटात ती अशा एका आजाराने ग्रस्त आहे, ज्यामुळे तिला वारंवार ‘हिचकी’ येते.