तानाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा मराठमोळा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:30 PM2019-11-14T16:30:32+5:302019-11-14T16:36:42+5:30

अजय देवगणने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता कलाकार साकारणार हे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Ajay Devgn reveals Sharad Kelkar as Chhatrapati Shivaji Maharaj in 'Tanhaji' new poster | तानाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा मराठमोळा अभिनेता

तानाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा मराठमोळा अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्देतानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार आहे. शरदने आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याविषयी नुकतेच अजय देवगणने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे.

तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटात अजय देवगण तानाजी यांच्या भूमिकेत असून त्याने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता कलाकार साकारणार हे आपल्याला पाहायला मिळत आहे. डोक्यावर जीरेपोट, टोकदार दाढी आणि गळ्यात मोत्यांची माळ या राजेशाही थाटातील शिवाजी महाराजांचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून त्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा... याचसोबत या पोस्टरमध्ये घोड्यावर स्वार झालेले महाराज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार आहे. शरदने आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचसोबत अजयने जिजाऊंच्या भूमिकेत कोण असणार हे देखील सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ही भूमिका पद्मवती राव या अभिनेत्री साकारणार आहेत. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं असून हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ajay Devgn reveals Sharad Kelkar as Chhatrapati Shivaji Maharaj in 'Tanhaji' new poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.