Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:37 PM2023-03-13T16:37:04+5:302023-03-13T16:38:12+5:30

Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again : अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय.

Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again to hit cinemas on Diwali 2024 | Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

googlenewsNext

Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again : अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय. सिंघम (Singham) आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट हिट ठरल्यानंतर रोहित शेट्टीने सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची घोषणा केली होती. आता सिंघम अगेनबद्दल एक मोठं अनडेट आहे. रिपोर्टनुसार, याचवर्षी जुलै महिन्यात सिंघम अगेनचं शूटींग सुरू होणार आहे. पुढीलवर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.

 अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे.  लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सध्या अजय याच चित्रपटात बिझी आहे. येत्या ३० मार्चला भोला रिलीज होतोय. सध्या अजय याचं प्रमोशन करतोय. या चित्रपटातून मोकळा होताच, अजय सिंघम अगेनचं शूटींग सुरू करणार आहे. यात अजय देवगणसोबत दीपिका पादुकोणही झळकणार आहे. फीमेल कॉपच्या रोलमध्ये दीपिका दिसणार म्हटल्यावर तिचे चाहतेही क्रेझी झाले आहेत. रोहित शेट्टी आणि दीपिकाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता ‘सिंघम 3’च्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

 

2011 मध्ये अजय देवगणचा ‘सिंघम’हा चित्रपट रिलीज झाला होता. रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर 2014मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘सिंघम रिटर्न्स’ रिलीज झाला.  ‘सिंघम 2’ देखील सुपरहिट ठरला. आता आठ वर्षानंतर सिंघम अगेन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

Web Title: Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again to hit cinemas on Diwali 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.