Video: ‘बाहुबली’पेक्षाही दमदार! ‘RRR’मधील ‘भीम’चा फर्स्ट लूक एकदम खतरनाक
By रूपाली मुधोळकर | Published: October 22, 2020 01:56 PM2020-10-22T13:56:13+5:302020-10-22T13:56:26+5:30
‘बाहुबली’ इतकाच भव्यदिव्य...
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’नंतर दिग्दर्शक एस.एस. राजमौली ‘आरआरआर’ हा सिनेमा घेऊन येत आहेत आणि या सिनेमाचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये ‘भीम’चा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. भीमची ही दमदार भूमिका ज्युनिअर एनटीआरने साकारली आहे.
ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा हे तेगलू इंडस्ट्रीतील प्रचंड फॅन फॉलोइंग असलेले दोन स्टार्स शिवाय आलिया भट व अजय देवगण हे बॉलिवूड सुपरस्टार्स असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेज आहे. मात्र हा सिनेमा ‘बाहुबली’ इतकाच भव्यदिव्य असणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
‘आरआरआर’चे फर्स्ट लूक पाहिल्यानंतर या प्रश्नाचेही उत्तर मिळाले आहे. ‘आरआरआर’चा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर हा सिनेमा ‘बाहुबली’इतकाच नाही तर त्यापेक्षाही अधिक दमदार असणार, हे स्पष्ट झालेय. व्हिडीओ पाहताना सुरुवातीलाच ‘बाहुबली’ची आठवण येते आणि अख्खा व्हिडीओ पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते.
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Bheem ke baare mein batane ke liye hamare Ramaraju se behtar aur kaun ho sakta hai?🔥🌊
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 22, 2020
Introducing our Bheem to you all👍🏻https://t.co/iu842sBuGn@ssrajamouli@tarak9999@AlwaysRamCharan@aliaa08@OliviaMorris891@RRRMovie@DVVMovies#RamarajuForBheem#RRRMovie#BheemFirstLook
अजयनेही शेअर केला फर्स्ट लूक
अजय देवगणने या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ‘भीम के बारे में बताने के लिए हमारे रामाराजू से बेहतर और कौन हो सकता है? आप सभी मिलिए भीम से,’ असे त्याने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.
खर्च केला पाण्यासारखा पैसा...
राजमौली यांनी हा सिनेमा बनवण्यात कोणतीही तडजोड केली नाही. अगदी एका एका सीनवर पाण्यासाखा पैसा खर्च केला. राम चरणच्या एन्ट्री सीनवर राजमौली यांनी 15 कोटी रुपये खर्च केलेत. यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या एन्ट्री सीनसाठी राजमौलीच्या टीमने 25 कोटींचा बजेट फायनल केला. म्हणजे, केवळ दोन सीनसाठी 40 कोटी रूपये खर्च करण्यात आले. केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा ‘आरआरआर’ हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कदाचित पहिला चित्रपट आहे. खरे तर इतक्या बजेटमध्ये दोन चांगले चित्रपट बनू शकले असते. पण राजमौलींना कुठलीही तडजोड मान्य नाही. दोन्ही हिरोंची एन्ट्री शानदार, दमदार व्हावी, अशी त्यांची इच्छा होती आणि त्याचमुळे या एन्ट्री सीनवर त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण १० भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आरआरआर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली होती. आता 'आरआरआर' हा बिग बजेट सिनेमा किती कमाई करतो ते बघूच.