'रेड २'च्या रिलीजआधीच तिसऱ्या भागाचीही चर्चा; दिग्दर्शक म्हणाले, "काही स्क्रिप्ट्स आहेत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:38 IST2025-04-18T12:37:55+5:302025-04-18T12:38:26+5:30

नुकतंच सिनेमाच्या दिग्दर्शकाने 'रेड ३'वर भाष्य केलं.

ajay devgn starrer raid 2 before release of the film raid 3 also in talks director reveals | 'रेड २'च्या रिलीजआधीच तिसऱ्या भागाचीही चर्चा; दिग्दर्शक म्हणाले, "काही स्क्रिप्ट्स आहेत.."

'रेड २'च्या रिलीजआधीच तिसऱ्या भागाचीही चर्चा; दिग्दर्शक म्हणाले, "काही स्क्रिप्ट्स आहेत.."

अजय देवदणच्या (Ajay Devgn) 'रेड २' (Raid 2) ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. आयकर अधिकारी अमर पटनायकच्या भूमिकेतून तो पुन्हा येत आहे. यावेळी अजयसमोर रितेश देशमुख आहे. रितेश सिनेमात नेत्याची भूमिका साकारत असून अजय त्याच्याच घरी छापेमारी करायला जातो असं दाखवण्यात आलं आहे. 'रेड २'च्या चर्चांमध्येच 'रेड ३'चीही चर्चा सुरु झाली आहे. नुकतंच सिनेमाच्या दिग्दर्शकाने 'रेड ३'वर भाष्य केलं.

'रेड २'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिग्दर्शक राज कुमार (Raj Kumar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांना तिसऱ्या भागाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "आधी दुसरा भाग तर प्रदर्शित होऊ द्या. आपल्या सिनेमाला योग्य वेळी रिलीज करणं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणं हे फिल्ममेकरसाठी खूप गरजेचं असतं. रेड २ बनवण्यासाठी अडीच वर्ष आम्ही मेहनत घेतली. सिनेमा सत्य घटनेवर असला तरी याची पटकथा लिहायला दीड वर्ष लागलं. यावेळी आम्ही काही फिक्शनल एलिमेंट आणण्याचाही प्रयत्न केला आहे."

'रेड ३'विषयी ते म्हणाले, "माझ्या हातात काही स्क्रिप्ट्स आहेत. पण याबद्दलचा निर्णय मी रेड २ च्या रिलीजनंतरच करेन. आपल्याला एखाद्या गोष्टीवर सिनेमा बनवायचा असतो मात्र शेवटी तुम्ही काहीतरी वेगळंच करता असंही होतं. प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी गोष्टी एका रेषेत आणणं गरजेचं असतं."

'रेड २' सिनेमा १ मे रोजी रिलीज होणार आहे. पहिल्या भागात खलनायक असलेले सौरभ शुक्लाही या भागात दिसणार आहेत. रितेस देशमुख त्यांच्याच नातेवाईकाच्या भूमिकेत आहे. यावेळी अमर पटनायकला रितेशविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी भरपूर अडचणी येणार आहेत.

Web Title: ajay devgn starrer raid 2 before release of the film raid 3 also in talks director reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.