काय सांगता? अजय देवगणने नव्या बंगल्यासाठी घेतलं कोट्यावधीचं कर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:18 PM2021-06-20T18:18:40+5:302021-06-20T18:19:52+5:30
कोरोना काळात बॉलिवूडचा ‘सिंघम’अजय देवगणने कोट्यावधी रूपयांचा बंगला खरेदी केला होता. आता या बंगल्याशी संबंधित आणखी एक माहिती मिळतेय
कोरोना काळात बॉलिवूडचा ‘सिंघम’अजय देवगणने (Ajay Devgn) कोट्यावधी रूपयांचा बंगला खरेदी केला होता. अजयने गेल्यावर्षीच मुंबईत जुहू भागात असलेला हा बंगला खरेदी केला होता. पण ताबा मिळायला वर्ष लागलं. आता या बंगल्याशी संबंधित आणखी एक माहिती मिळतेय. होय, या बंगल्यासाठी अजयने म्हणे कोट्यवधी रूपयांचे कर्ज घेतले आहे.
बॉलिवूड हंगामाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, अजयने या बंगल्यासाठी 18.75 कोटींचे लोन घेतलेय. घराची खरेदी गतवर्षी डिसेंबर महिण्यात पूर्ण झाली होती. तर कर्ज एप्रिल 2021 मध्ये घेण्यात आल्याचे कळतेय. (Ajay Devgn takes loan of rupees 18 crore for his new bunglow)
अजयने खरेदी केलेल्या या बंगल्याचे नाव ‘शक्ती’ आहे. या बंगल्याची मूळ किंमत 65 ते 70 कोटी होती. मात्र कोरोना महामारीमुळे रिअल इस्टेस्ट मार्केटमध्ये मंदी आहे. याचा लाभ घेत अजयने घाईघाईत हा बंगला खरेदी केला. यासाठी त्याने 60 कोटी रुपये मोजल्याचे सांगण्यात आले होते. पण आता 47 कोटींमध्ये डिल फायनल झाल्याचे समोर येत आहे. अजयने घराची 2.72 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरली आहे.
अजय व काजोल गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. यादरम्यान एका मित्राने त्यांना या बंगल्याबद्दल सुचवले. अजय व काजोलने हा बंगला पाहिला आणि पाहताक्षणीच तो त्यांना पसंत पडला.
5 हजार 590 चौरस फुटांमध्ये विस्तारलेल्या या बंगल्यात पार्किंगसाठी खास व्यवस्था आहे. सुंदर गार्डन आणि एक लहानसा स्वीमिंग पूलही आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच या बंगल्याचे खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला. अजय देवगणने बंगल्याचे नुतनीकरण सुरू आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बंगल्यात काही बदल केले जाणार असल्याचे कळतेय. लवकरच अजय या बंगल्यात राहायला येणार असल्याचेही मानले जात आहे.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर येत्या काळात त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.यात मैदान, भूज- द प्राईड आॅफ इंडिया, थँक गॉड या सिनेमांमा समावेश आहे. याशिवाय गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर या सिनेमातही तो झळकणार आहे.