#AskBholaa: फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:10 AM2023-03-15T10:10:23+5:302023-03-15T10:10:50+5:30

#AskBholaa: अजय देवगणचा ‘भोला’ नावाचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अजय फुल्ल टशनमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. याच प्रमोशनचा भाग म्हणून अजयने आपल्या चाहत्यांसाठी ‘#AskBholaa’ सेशन ठेवलं.

Ajay Devgn Talks About Tabu Launching Son Yug In ASK Bholaa Session | #AskBholaa: फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं उत्तर, म्हणाला...

#AskBholaa: फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं उत्तर, म्हणाला...

googlenewsNext

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn ) सध्या सतत चर्चेत आहे. अजयचा अलीकडे आलेला ‘दृश्यम २’ हा सिनेमा तुफान चालला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला. आता अजयचा नवा सिनेमा येतोय. होय, त्याचा ‘भोला’ नावाचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहून अजयच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजय देखील फुल्ल टशनमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. याच प्रमोशनचा भाग म्हणून अजयने आपल्या चाहत्यांसाठी ‘#AskBholaa’ सेशन ठेवलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी अजयला एकापेक्षा एक भन्नाट प्रश्न विचारले आणि अजयनेही तितकीच भन्नाट उत्तरं दिलीत.

एका चाहत्याने तब्बूबद्दल (Tabu) प्रश्न केला. अजयच्या बहुतांश चित्रपटात तब्बू असतेच असते. अलीकडे आलेल्या ‘दृश्यम २’मध्ये ती होतीच. त्याआधर ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटांमध्येही ती अजशसोबत दिसली. आता दोघंही ‘भोला’मध्येही एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात तब्बू पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर चाहत्याने प्रश्न केला.

‘सगळे चित्रपट तब्बूबरोबर का करताेय? त्यामागचं काही खास कारण आहे का?’ असा प्रश्न चाहत्याने अजयला केल्या. त्यावर  ‘तिच्या तारखा मिळाल्या, म्हणून...’असं उत्तर अजयने दिलं. तबूच्या तारखा मिळाल्याने चित्रपट करत असल्याचं मजेशीर उत्तर अजयने दिलं.

तू फावल्या वेळात काय करतोस? असा प्रश्न एका चाहत्याने विचारल्यावर, जेव्हा फावला वेळ मिळेल, तेव्हा सांगेल, असं भन्नाट उत्तर अजयने दिलं.

युग ला कधी लॉन्च करणार?

तुझा मुलगा युगला कधी लॉन्च करणार ? असा सवालही एका चाहत्याने केला. यावर लॉन्चचं माहित नाही. सध्या तरी त्याने योग्य वेळी लन्च करणंच खूप मोठी गोष्ट आहे, असं मजेशीर उत्तर अजयने दिलं.

एका यूजरने विचारले की, या वयात तुम्ही इतके फिट कसे आहात, त्यावर अभिनेत्याने भन्नाट उत्तर दिलं. मैं खाना और दीमाग सही मात्रा में खाता हूं..., असं तो म्हणाला.

अजशच्या ‘भोला’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास हा दाक्षिणात्य चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा या कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ajay Devgn Talks About Tabu Launching Son Yug In ASK Bholaa Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.