Chhapaak & Tanhaji Movie : दीपिकाच्या 'छपाक'वर अजय देवगणचा 'तान्हाजी' असा पडला भारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:07 PM2020-01-16T13:07:28+5:302020-01-16T13:07:34+5:30
Box Office Collection Chhapaak and Tanhaji Movie : जाणून घ्या आतापर्यंत सगळे कलेक्शन एका क्लिलवर,
गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दोन सिनेमा रिलीज झाले. रिलीजच्या आधीपासून दोनही सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होते. अजय देवगणचा 'तान्हाजी' आणि दीपिकाचा 'छपाक' सिनेमा.
बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, साहाव्या दिवशी 'तान्हाजी'ने 16 कोटींचा गल्ला जमावला. अजयच्या सिनेमाने आतापर्यंत 104 कोटी जमावले आहेत. दीपिकाच्या 'छपाक'ने सहाव्या दिवशी 2 ते 2.25 कोटींचा बिझनेस केला. एकूण 'छपाक'ने आतापर्यंत 24.50 कोटींचा गल्ला जमावला.
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत आहे.या चित्रपटाचं प्रमोशन व खर्च पकडून या चित्रपटाचं एकूण बजेट ४५ कोटी आहे. चित्रपट हिट होण्यासाठी ६० कोटींची कमाई करावी लागेल. छपाकला एकूण २,१६० स्क्रीन्स मिळाले आहेत. भारतात १७०० स्क्रीन्स व परदेशात ४६० स्क्रीन्सचा समावेश आहे.
'तान्हाजी' प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले.या सिनेमाला 4540 स्क्रीन्स मिळाले व या सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे.
दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा एक ऐतिहासिकपट आहे. आणि ऐतिहासिक चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही काळात प्रदर्शित झालेले 'मणिकर्णिका', 'पद्मावत', 'पानिपत', 'बाजिराव मस्तानी' यांसारख्या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली.
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत आहे.