'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:41 IST2024-02-23T14:40:58+5:302024-02-23T14:41:37+5:30
Ajay devgn: १० वर्षांपूर्वी अनेक सिनेमांच्या सेटवर अजयला काही अदृश्य शक्तींचा आभास झाला आहे. विशेष म्हणजे याविषयी पहिल्यांदाच तो व्यक्त झाला असून त्याने त्याचा भितीदायक अनुभव सांगितला आहे.

'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay devgn) सध्या त्याच्या 'शैतान' या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. नुकताच या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा वशीकरणासारख्या मुद्द्यावर आधारित असून सध्या या सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्ये अलिकडेच एका मुलाखतीमध्ये अजय देवगण याने सुपरनॅच्युरल पॉवरविषयी भाष्य केलं. इतकंच नाही तर त्याने खऱ्या आयुष्यातही अशा दृष्ट शक्तींचा सामना केल्याचं म्हटलं आहे.
अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव
"मी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अशा काही गोष्टींचा अनुभव घेतला आहे. १०-१२ वर्ष मी शुटिंग बाहेर करायचो. त्यामुळे अनेकदा मला अनेक सेटवर अशा काही सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव आला आहे. त्यांचा आभास झाला आहे. माझ्यासाठी हे सगळं फार त्रासदायक होतं", असं अजय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या सगळ्या गोष्टी मला पुन्हा अनुभवायच्या नाहीत. काळ्या जादूसारखे प्रकार आजही वास्तवात असतात. पण, प्रत्येक धर्मात अशा गोष्टींची खिल्ली उडवली जाते.
दरम्यान, 'शैतान' हा सिनेमा येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका की कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली आहेत. या सिनेमात आर. माधवन याने शैतानची भूमिका साकारली असून तो त्याच्या अलौकिक शक्तीचा वापर करुन अजयच्या लेकीला वश करतो असं दाखवण्यात आलं आहे. थोडक्यात, या सिनेमातून वाईट शक्तींवर चांगल्या गोष्टींनी कसा विजय मिळवता येतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.