बॉलिवूड स्टार्स जळतात...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या ‘ट्विटर वॉर’मध्ये रामगोपाल वर्मांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 10:46 AM2022-04-28T10:46:43+5:302022-04-28T10:57:10+5:30

Ajay Devgn vs Kiccha Sudeep controversy : बॉलिवूड असुरक्षित..‘रनवे 34’ किती कमावतो ते बघूच...; राम गोपाल वर्मा यांनी केला किच्चा सुदीपचा बचाव

Ajay Devgn vs Kiccha Sudeep controversy Ram Gopal Varma says ‘North stars are insecure and jealous | बॉलिवूड स्टार्स जळतात...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या ‘ट्विटर वॉर’मध्ये रामगोपाल वर्मांची उडी

बॉलिवूड स्टार्स जळतात...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या ‘ट्विटर वॉर’मध्ये रामगोपाल वर्मांची उडी

googlenewsNext

Ajay Devgn vs Kiccha Sudeep Hindi National Language Controversy : साऊथ चित्रपटांनी सर्वत्र धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे यानिमित्ताने भाषेचा वाद उफाळून आला आहे. साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) बोलला आणि त्याचं वक्तव्य ऐकून बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn )भडकला,असा सगळा हा मामला आहे. ‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही,’ असं वक्तव्य किच्चा सुदीपने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर अजयने चांगलाच समाचार घेतला. ‘हिंदी राष्ट्रभाषा नाही तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीत डब का करता?’, असा खरपूस सवाल अजयने किच्चाला केला. यावरून अजय व किच्चा यांच्यात ‘ट्विटर वॉर’ रंगलं असताना आता या वादात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी उडी घेतली आहे.

केला किच्चा सुदीपला सपोर्ट
राम गोपाल वर्मा यांनी या वादात किच्चा सुदीपचा बचाव केला. किच्चाचं कौतुक करत त्यांनी अजय देवगण याच्यावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘मी हिंदी शिकलो आहे. मी या भाषेचा प्रचंड आदर करतो. पण मी जर माझं ट्विट कन्नडमध्ये केलं असतं तर काय झालं असतं?’, असा प्रश्न किच्चाने अजयला रिप्लाय देताना केला होता. किच्चाच्या याच ट्विटचा संदर्भ देत रामगोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘किच्चा, तुझ्या या प्रश्नात दम आहे. याशिवाय दुस-या चांगल्या पद्धतीने हा मुद्दा समजवता आलाच नसता. तू अजयच्या हिंदी ट्विटला कन्नडमध्ये उत्तर दिलं असतं तर? तुझं कौतुक करायलाच हवं. प्रत्येकाला हे कळायला हवं की कोणताही नॉर्थ-साऊथ भेद नाहीये आणि भारत अखंड आहे,’असं रामगोपाल वर्मा यांनी लिहिलं.

बॉलिवूड असुरक्षित..

हिंदी भाषेच्या वादावर प्रतिक्रिया देताना रामगोपाल वर्मा यांनी आणखी एक ट्विट केलं. ‘नॉर्थच्या स्टार्सला साऊथ स्टार्सपासून असुरक्षित वाटू लागलं आहे आणि त्यांचा जळफळाट होतोय. कारण केजीएफ 2 ने ओपनिंग डेवर 50 कोटी कमावले. आपल्या सर्वांना आगामी हिंदी सिनेमाच्या ओपनिंग कलेक्शनची प्रतीक्षा आहे,’असं ते म्हणाले.

‘रनवे 34’ किती कमावतो ते बघूच..
अन्य एका ट्विटमध्ये रामगोपाल यांनी थेट अजय देवगणच्या ‘रनवे 34’ या आगामी चित्रपटाला आव्हान दिलं. ‘रनवे 34चं कलेक्शन सिद्ध करेल की हिंदी विरूद्ध कन्नडमध्ये किमी दम आहे,’अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. ‘अजय मी तुला दीर्घकाळापासून ओळखतो. तू बोललास, पण तुझा अर्थ तो नसावा, हे मी समजू शकतो. भाषा या आपल्याला जोडण्याचं काम करतात, तोडण्याचं नाही,’ अशा गोड शब्दांत त्यांनी अजय देवगणला ‘समज’ही दिली.

Web Title: Ajay Devgn vs Kiccha Sudeep controversy Ram Gopal Varma says ‘North stars are insecure and jealous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.