'फूल और कांटे'साठी अजय देवगणला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केली होती निवड; पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:32 IST2025-01-15T13:31:37+5:302025-01-15T13:32:05+5:30
Ajay Devgan : अजय देवगणचा 'फूल और कांटे' चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी अजय दिग्दर्शक कुकू कोहली यांची पहिली पसंती नव्हता.

'फूल और कांटे'साठी अजय देवगणला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केली होती निवड; पण..
अजय देवगण(Ajay Devgan)ने 'फूल और कांटे' (Phool Aur Kaante) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, कुकू कोहली यांच्या चित्रपटासाठी अजयला त्यांची पहिली पसंती नव्हती. त्यांनी अजय देवगणच्या आधी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची निवड केली होती. मात्र नंतर अजयची निवड करण्यात आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक कुकू कोहली यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'फूल और कांटे' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याची पहिली पसंती अक्षय कुमार होती. पण १९९१ च्या या चित्रपटात अक्षय कुमारची जागा नंतर अजय देवगणने घेतली होती. दिग्दर्शक म्हणाला, "मी अजयचे दोन शॉट्स घेतले आणि त्याला कॅज्युअली वागायला सांगितले. त्याला दीड तास लागला, पण मला त्याच्या डोळ्यात खोली, एक विशिष्ट भावना आणि शक्यता दिसली, जी मला आवडली."
अक्षय कुमारची झालेली स्क्रीन टेस्ट
कुकू कोहलींनी सांगितले की, "सुरुवातीला मी याच विषयावर अक्षय कुमारची स्क्रीन टेस्ट घेतली होती आणि तो चित्रपटात होता. मी सोनाली बेंद्रेसह ३-४ अभिनेत्रींसोबत टेस्ट म्हणून एक गाणेही शूट केले होते. ते चांगले होते. मात्र, जवळपास त्याच वेळी, अक्षय कुमार आणि करिश्मा कपूरला प्रमोद चक्रवर्तीच्या बॅनरखाली एका चित्रपटासाठी साइन केले गेले.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण आता आझाद या चित्रपटात दिसणार आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, तर अक्षय कुमार वीर पहाडियासोबत स्काय फोर्स या चित्रपटात दिसणार आहे.