न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून भडकला अजय देवगण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 06:53 PM2019-04-08T18:53:43+5:302019-04-08T19:00:13+5:30

काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाचा फोटो विमानतळाच्या बाहेर काढण्यात आला होता. या फोटोत तिने एक लाँग टी-शर्ट घातला असल्याने तिची शॉर्ट पँट दिसत नव्हती.

Ajay Devgn’s Daughter Nysa Gets ‘Fat-Shamed’ For Airport Look, Father Comes to Her Rescue | न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून भडकला अजय देवगण

न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून भडकला अजय देवगण

googlenewsNext
ठळक मुद्देलोक कमेंट करताना न्यासा ही केवळ चौदा वर्षांची आहे याचा विचार देखील करत नाहीयेत. न्यासाला ज्या फोटोसाठी ट्रोल केले, त्या फोटोत तिने मोठा टी-शर्ट घातला होता. त्यामुळे तिने घातलेले शॉर्ट्स दिसत नव्हते.

सेलिब्रेटी इतकेच महत्त्व सेलिब्रेटी किडला देखील असते. आजकालच्या जमान्यात तर सेलिब्रेटी किडच्या मागे देखील प्रसारमाध्यमं फिरत असल्याचे दिसून येतात. सेलिब्रेटीची मुले कुठे जात आहेत, त्यांनी काय घातले आहे याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर देखील हे सेलिब्रेटी किड्स नेहमीच चर्चेत असतात.

काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाचा फोटो विमानतळाच्या बाहेर काढण्यात आला होता. या फोटोत तिने एक लाँग टी-शर्ट घातला असल्याने तिची शॉर्ट पँट दिसत नव्हती. यावरूनच न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. न्यासा पँट घालायला विसरली का अशाप्रकारची प्रश्न देखील तिच्या फोटोवर लोकांनी विचारला होता. या सगळ्यावर अजय आणि काजोलने मौन राखणेच पसंत केले होते. पण हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अजयने याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे. अजय सांगतो, लोक कमेंट करताना न्यासा ही केवळ चौदा वर्षांची आहे याचा विचार देखील करत नाहीयेत. न्यासाला ज्या फोटोसाठी ट्रोल केले, त्या फोटोत तिने मोठा टी-शर्ट घातला होता. त्यामुळे तिने घातलेले शॉर्ट्स दिसत नव्हते. माझी सगळ्या फोटोग्राफर्सना विनंती आहे की, आमच्या लहान मुलांचे फोटो काढणे तरी बंद करा. कोणतेच स्टार किड फोटोग्राफर्ससमोर कर्म्फटेबल नसतात. त्यांना घरातून निघताना प्रत्येकवेळी आवरायला आवडत नाही. त्यांना देखील त्यांची स्पेस हवी असते. ट्रोलिंगमुळे तर मुलांना खूपच वाईट वाटते. 

अजय देवगण सध्या त्याच्या दे दे प्यार दे या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात तो त्याच्यापेक्षा वयाने कित्येक वर्षं लहान असलेल्या रकुल प्रीत सिंह सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात त्याची जोडी तब्बूसोबत देखील जमणार आहे. या चित्रपटासोबतच तो तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच बाहुबली फेम राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण आणि ज्यूनिअर एनटीआरसोबत अजय झळकणार आहे. 

Web Title: Ajay Devgn’s Daughter Nysa Gets ‘Fat-Shamed’ For Airport Look, Father Comes to Her Rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.