आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:14 AM2019-05-29T10:14:44+5:302019-05-29T10:18:37+5:30
न्यासाला नुकतेच मुंबईत एका सलोनच्या बाहेर पाहाण्यात आले. यावरून एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणला सोशल मीडियावर ट्रोल करणे यात काही नवीन नाहीये. कधी कपड्यांमुळे तर कधी लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. पण न्यासाला नुकतेच मुंबईत एका सलोनच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी स्टायलिश लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा फोटो मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. पण हा फोटो पाहाताच एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
न्यासाचा हा फोटो मानवच्या इन्स्टाग्रामवर काल पोस्ट करण्यात आला होता. पण न्यासाचे आजोबा वीरू देवगण यांचे परवा निधन झाले. त्यामुळे आजोबांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी न्यासा सलोनच्या बाहेर दिसल्याने सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. तिच्या आजोबांचे निधन नुकतेच झाले असताना ती सलोनला कशी का जाऊ शकते असे काहींनी कमेंट केले तर हा फोटो पाहिल्यानंतर या स्टार किडना खरंच भावना नसतात असे काहींनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर हा फोटो काल इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला असला तरी तो कधी काढण्यात आला हे या फोटोवरून कळत नाहीये. त्यामुळे खरंच हा फोटो कालचा आहे का अशा प्रश्न मानवला सोशल मीडियाद्वारे विचारण्यात येत आहे.
वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे नुकतेच निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वीरू देवगण हे अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असून त्यांचा मुलगा अजय देवगण आणि सून काजोल देवगण हे देखील अनेक वर्षांपासून बॉलिवूडचा भाग आहेत. त्यामुळे वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ अजय देवगण यांच्या घरी पोहोचले होते.