अजय देवगणच्या चाहत्यांनो, ‘दे दे प्यार दे’साठी करावी लागणार प्रतीक्षा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:07 PM2019-02-01T14:07:55+5:302019-02-01T14:08:08+5:30

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा आगामी सिनेमा ‘दे दे प्यार दे’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय,‘दे दे प्यार दे’ची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे.

ajay devgns de de pyar de release date postponed on may 17 |  अजय देवगणच्या चाहत्यांनो, ‘दे दे प्यार दे’साठी करावी लागणार प्रतीक्षा!!

 अजय देवगणच्या चाहत्यांनो, ‘दे दे प्यार दे’साठी करावी लागणार प्रतीक्षा!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. अजय देवगण तब्बल ८ वर्षांनंतर  रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा आगामी सिनेमा ‘दे दे प्यार दे’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय,‘दे दे प्यार दे’ची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे.
अजय स्टारर ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट येत्या १५ मार्चला रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट यावर्षी १७ मे रोजी प्रदर्शित होईल. ‘दे दे प्यार दे’च्या मेकर्सने खुद्द ही माहिती दिली आहे. अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे’  आणि ‘टोटल धमाल’ हे दोन्ही चित्रपट आपआपसात क्लॅश होत होते. म्हणजे ‘दे दे प्यार दे’ रिलीज झाल्यानंतर लगेच वीस दिवसांनी ‘टोटल धमाल’ रिलीज झाला असता. एकाच स्टारचे दोन चित्रपट केवळ २०दिवसांच्या फरकाने रिलीज होणे, हे कमाईच्या दृष्टीने योग्य नव्हते. यामुळे मार्केटींग कॅम्पेनमध्ये अडचणी उद्भवल्या असत्या.  ‘दे दे प्यार दे’ एक बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकणेचं योग्य समजले, असे चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार याने सांगितले.




‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. अजय देवगण तब्बल ८ वर्षांनंतर  रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावणार आहे. आठ वर्षांपूर्वी ‘दिल तो बच्चा है जी’ या रोमॅन्टिक कॉमेडीपटात अजय दिसला होता. या चित्रपटात शाहरूख खानही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. लव रंजन व टी सीरिज निर्मित हा चित्रपट अकीव अलीने दिग्दर्शित केला आहे.
तूर्तास अजय देवगण ‘तानाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात बिझी आहे.

Web Title: ajay devgns de de pyar de release date postponed on may 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.