भंगारमध्ये आढळली अजय देवगणची ‘टार्जन : द वंडर कार’, फेसबुकवर फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:19 AM2017-11-15T10:19:11+5:302017-11-15T15:49:11+5:30
अभिनेता अजय देवगण याची ‘टार्जन : द वंडर कार’ सध्या भंगारमध्ये असून, तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर!
व क्रम आदित्यशुक्ला हा फेसबुक युजर सध्या चर्चेत आला आहे. होय, या फेसबुक युजरला एक अशी गोष्ट सापडली जी तुम्हाला आठवत असेल. शिवाय ते बघून तुम्हाला धक्काही बसेल. या युजरने त्याच्या ‘क्लोज्ड ग्रुप एक्सडीए आॅफ-टॉपिक ग्रुप’मध्ये काही फोटोज् शेअर केले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर सर्वत्र या फोटोंचीच चर्चा रंगत आहे. हे फोटो बघून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
त्याचे झाले असे की, विक्रम नावाच्या या युजरला एक कार मिळाली. ही सामान्य कार नसून, ‘टार्जन : द वंडर कार’ आहे. होय, २००४ मध्ये आलेल्या अजय देवगण, वत्सल सेठ आणि आयशा टाकियाच्या ‘टार्जन : द वंडर कार’ चित्रपटात या कारची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. कारण संपूर्ण चित्रपटाची कथाच या कारच्या अवती-भोवती फिरणारी आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेली कार १९९१ मध्ये आलेल्या ‘टोयाटो एमआर-२’ होती. विकिपीडियानुसार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अयशस्वी झाल्यामुळे ही कार कधीच आतापर्यंत लॉन्च केली गेली नाही. या कारची तुलना २००४ च्या मित्सुबिधी एक्लिप्स आणि फरारी ३४८ या महागड्या कारशी केली जाते.
चित्रपट फ्लॉप झाल्याने ही कार सध्या भंगारमध्ये पडलेली आहे. चित्रपटाची कथा देवेन चौधरी (अजय देवगण), त्याची आई (फरीदा जलाल) आणि राज (वत्सल सेठ) यांच्यावर आधारित आहे. दरम्यान, चित्रपटात दाखविण्यात आलेली कार अतिशय चमत्कारिक करिष्मा करीत असल्याने ही कार प्रेक्षकांना भावेल, असे कदाचित निर्मात्यांना वाटत असावे. परंतु तसे काहीच घडले नाही. बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविण्यात हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे ही कार कायमची भंगारमध्ये गेली.
दरम्यान, विक्रम आदित्यशुक्ला या युजरने भंगारमध्ये पडलेल्या या कारचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करून एकच खळबळ उडवून दिली आहे. सध्या सर्वत्र या कारचीच चर्चा होत आहे. काही युजरने तर भंगारमध्ये पडलेली ही कार खरेदी करण्याचा मनोदयही बोलून दाखविला आहे.