अजय देवगणमुळे नाही तर या व्यक्तीमुळे आला सलमान खान आणि अक्षयकुमारमध्ये दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 05:28 AM2017-10-18T05:28:52+5:302017-10-18T10:58:52+5:30

आतापर्यंत आपण हेच समजत आलो की अक्षय कुमारने अजय देवगणबरोबर मैत्री केल्यामुळे सलमान आणि अक्षयच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. ...

Ajay is not due to Devgan but this person has got Salman Khan and Akurakumar duraava | अजय देवगणमुळे नाही तर या व्यक्तीमुळे आला सलमान खान आणि अक्षयकुमारमध्ये दुरावा

अजय देवगणमुळे नाही तर या व्यक्तीमुळे आला सलमान खान आणि अक्षयकुमारमध्ये दुरावा

googlenewsNext
ापर्यंत आपण हेच समजत आलो की अक्षय कुमारने अजय देवगणबरोबर मैत्री केल्यामुळे सलमान आणि अक्षयच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. त्यामुळे सलमान खानने अक्षयला पार्टीमध्ये बोलावले नाही. पण खरं कारण काही वेगळेच आहे.

आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार सलमान खान अक्षयवर नाराज नसून तो कारण जोहरवर नाराज आहे, सलमान खानची इच्छा होती की करण जोहरने त्याची प्रॉडक्शन कंपनी 'धर्मा' बॅनरच्या खाली आपल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजेच आयुष शर्माला लाँच करावे. याबद्दल सलमानने करण जोहरला विचारले असता ना त्याने होकार दिला, ना नकार दिला. करण जोहर या गोष्टीला सतत टाळत राहिला त्यामुळे सलमान खान करण जोहरवर नाराज झाला. यानंतर सलमानने आयुषला आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचे ठरविले. इतकेच नाही तर सलमानने करण जोहरबरोबर केलेली पार्टनरशीप सुद्धा तोडली.

हो हे खरं आहे, तुम्हाला माहितीच असेल की सलमान खान करण जोहर बरोबर 'केसरी' या  चित्रपटची निर्मित करणार होता. मात्र आता फक्त करण जोहर एकटाच या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. सलमानच्या या निर्णयामुळे अक्षय कुमार त्याच्यावर नाराज झाला आहे. त्यामुळे कदाचित दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि म्हणूनच सलमानची बहिण अर्पिता खानच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीचे आमंत्रण अक्षयला देण्यात आले नाही. 

अजय देवगणसुद्धा सारागढीच्या युद्धावर आधारित 'बॅटल ऑफ सारागढी' नावाचा चित्रपट तयार करतो आहे. तर  दुसरीकडे अक्षय कुमारला घेऊन करण जोहरसुद्धा याच विषयावर चित्रपट तयार करतो आहे. या दोन्ही चित्रपटांची कथा सारखीच आहे. सारागढीची लढाई भारतातील सर्वात मोठी लढाई मानली जाते ज्यात 21 शीख सैनिकांनी सारागढी किल्ला पाठणापासून वाचवण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पाठणाबरोबर लढाई लढले होते. इंग्लंडने देखील त्यांच्या पराक्रमाचा सन्मान केला होता. 

Web Title: Ajay is not due to Devgan but this person has got Salman Khan and Akurakumar duraava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.