‘गंगूबाई काठियावाडी’ची होणार का ‘83’ सारखी दशा? कारण रिलीज होतोय साऊथचा एक मोठा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:10 PM2022-02-04T16:10:06+5:302022-02-04T17:49:33+5:30
Box Office Clash: येत्या 25 तारखेला आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि यासोबतच बॉक्स ऑफिसवर यंदाचा सर्वात मोठा क्लॅशही रंगणार आहे.
Box Office Clash: संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आजच आलिया भट (Alia Bhatt) स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. येत्या 25 तारखेला आलियाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि यासोबतच बॉक्स ऑफिसवर यंदाचा सर्वात मोठा क्लॅशही रंगणार आहे. कारण ‘गंगूबाई काठियावाडी’च्या एकदिवस आधी म्हणजे 24 फेब्रुवारीला ‘वलमई’ (Valimai) हा साऊथचा एक मोठा सिनेमा देखील रिलीज होणार आहे. तामिळसोबतच हिंदी, तेलगू व कन्नड भाषेत तो प्रदर्शित होतोय. अजीत कुमारच्या (Ajith Kumar) या साऊथ सिनेमाची आधीच चांगली हवा आहे. अशात ‘गंगूबाई काठियावाडी’ समोर कडवं आव्हान असणार आहे.
‘पुष्पा’नंतर साऊथ सिनेमांची क्रेझ जबरदस्त वाढली आहे. अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला आहे. याऊलट साऊथच्या सिनेमांची चलती आहे. बॉलिवूड सिनेमांचा प्रेक्षकवर्गही साऊथ चित्रपटांकडे आकर्षित होताना दिसतोय. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हे त्याचं ताजं उदाहरण.
Actions speak louder than words. The wait is well & truly over. Feel the power on 24 Feb, in cinemas worldwide. #Valimai#Valimai240222#ValimaiFromFeb24#AjithKumar#HVinoth@thisisysr@BayViewProjOffl@ZeeStudios_@sureshchandraa@ActorKartikeya#NiravShah@humasqureshipic.twitter.com/K6uyLlHRLl
— Boney Kapoor (@BoneyKapoor) February 2, 2022
दुसऱ्या लॉकडाऊननंतर ‘सूर्यवंशी’ व ‘83’ असे बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट रिलीज झाले होते. ‘सूर्यवंशी’ने चांगली कमाई केली. पण ‘पुष्पा’ने ‘83’ला धूळ चारली. अंतिम, सत्यमेव जयते 2, अतरंगी रे हे बॉलिवूडचे सिनेमेही ‘पुष्पा’समोर कमाल दाखवू शकले नाहीत. एकीकडे बॉलिवूडचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, त्याचवेळी दुसरीकडे ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘83’सोबत रिलीज झालेल्या ‘पुष्पा’च्या हिंदी सिनेमाने 100 कोटीपार कमाई केली.
साऊथची क्रेझ, अजित कुमार सारखा ‘मास हिरो’ हे बघता ‘वलीमई’चं कडवं आव्हान ‘गंगूबाई काठियावाडी’समोर असणार आहे. यात कोण बाजी मारतं ते बघूच.