​अखिलेश यादव यांचे बॉलिवूड कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 05:49 PM2017-01-17T17:49:01+5:302017-01-17T18:08:57+5:30

उत्तर प्रदेशातील यादवी संघर्षामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बॉलिवूड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. राजकीय ...

Akhilesh Yadav's Bollywood connection | ​अखिलेश यादव यांचे बॉलिवूड कनेक्शन

​अखिलेश यादव यांचे बॉलिवूड कनेक्शन

googlenewsNext
्तर प्रदेशातील यादवी संघर्षामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बॉलिवूड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. राजकीय डावपेचात आपल्याच वडिलांना मात दिलेल्या अखिलेश यादव यांचा राजकारणातच नव्हे तर सेलिब्रिटींमध्येही जलवा आहे. अखिलेश यांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला बॉलिवूडमधील स्टार सेलिब्रिटी नसेल असे प्रसंग क्वचितच घडले आहेत. अशाच काही अखिलेश यांच्या सेलिब्रिटींसोबतच्या प्रसंगांचा घेतलेला हा आढावा...



लग्नात बॉलिवूड सेलेब्सची गर्दी
वयाच्या २५ व्या वर्षी जेव्हा अखिलेश यांचा डिंपल यांच्याशी विवाह झाला तेव्हा बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने त्यांच्या विवाहात हजेरी लावली. यावेळेस पहिल्यांदाच अखिलेश यांचा बॉलिवूड सेलिब्रिटींशी सामना झाला असल्याचा उलगडा त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान केला होता. लग्नात आलेल्या ९० टक्के पाहुण्यांना ते ओळखत नसल्याने अचानक समोर आलेल्या सेलेब्सशी बोलताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर मात्र सेलिब्रिटी आणि अखिलेश हे जणू काही नातेच निर्माण झाले. बॉलिवूडबरोबरच अनेक खेळाडूंशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या बहुतेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना सेलेब्स हमखास हजेरी लावत असतात. 



पॉलिटिकल करिअर आणि सेलिब्रिटी
२००० मध्ये आपल्या पॉलिटिकल करिअरला सुरूवात करणाºया अखिलेश यादव यांचे सेलिब्रिटी कनेक्शन राजकारणाच्या सारीपाटावरच घनिष्ठ झाले. सलमान खान, कॅटरिना कैफ, विद्या बालन, अजय देवगण, हृतिक रोशन अशा अनेक दिग्गज कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारणात वावरताना बॉलिवूडशी नाते असावे असे त्यांचे नेहमीच म्हणणे राहिले आहे. त्यातच सर्वात यंगेस्ट सीएम म्हणून त्यांचा लौकीक असल्याने सेलेब्सही त्यांच्याप्रती आकर्षित असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले. 



कॅटरिना कैफ
२०१३ मध्ये जेव्हा अभिनेत्री कॅटरिना कैफ हॉकी इंडिया लीगच्या उद्घाटनप्रसंगी आली होती, तेव्हा तिने स्वत:हून अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये बºयाचवेळ गप्पाही रंगल्या होत्या. दोघेही चांगल्या मूडमध्ये दिसत होते. स्टेजवर रंगलेल्या या गप्पा माध्यमांमध्येही चर्चेचा विषय ठरले होते. कॅटरिना विचारत असलेल्या प्रत्येक प्रश्नांचे सीएम अखिलेश यादव स्मितहास्याने उत्तर देत होते. 



तुषार कपूर
‘क्या कुल है हम-३’ च्या प्रमोशनसाठी अभिनेता तुषार कपूर आणि त्याची सहअभिनेत्री क्लोडिया यांनी अखिलेश यादव यांच्या दरबारात हजेरी लावत सिनेमाचे प्रमोशन केले होते. राजकीय व्यासपीठावर सिनेमाचे प्रमोशन करणे फारच क्वचित बघावयास मिळते. त्यावेळेस तुषार कपूर आणि अखिलेश यांची भेट चर्चेत होती. 



सलमान खान
अभिनेता सलमान खान याच्या फॅन्समध्ये पॉलिटिकल लोकांचाही समावेश आहे. त्यामुळेच तो अनेक दिग्गज नेत्यांच्या व्यासपीठावर आतापर्यंत पहावयास मिळाला आहे. २०१४ मध्ये जेव्हा तो ‘सैफई महोत्सवात’ अभिनेत्री अली अवराम हिच्यासोबत परफॉर्म करायला आला होता. तेव्हा अखिलेश स्वत: त्याला रिसिव्ह करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा रंगली होती. 



हृतिक रोशन
सैफई महोत्सवात हृतिक रोशन यानेही हजेरी लावली होती. अखिलेश यांच्याबरोबरच त्यांची पत्नी डिंपल याही हृतिकच्या डायहार्ड फॅन असल्याने त्यांनी हृतिकशी भेटण्याची संधी सोडली नाही. परंतु आश्चर्य म्हणजे हृतिकच स्वत:हून त्यांना भेटण्यास गेला होता. यावेळी तिघांनीही फोटोसेशन केले होते. हृतिकच्या भेटीमुळे डिंपल हरखून गेली होती. 



अजय देवगण- श्रिया सरन
‘दृश्यम’ या सिनेमाच्या प्रमोशनप्रसंगी अभिनेता अजय देवगण आणि त्याची सहअभिनेत्री श्रिया सरन यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. बॉलिवूडमधील बहुतेक असे सेलेब्स आहेत, जे उत्तर प्रदेशात त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अखिलेशच्या दरबारात हजेरी लावत असतात. बºयाचवेळा असे प्रसंग बघावयास मिळाले आहेत. 



विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालन आणि यादव कुटुंबाचे घनिष्ठ संबंध आहेत. अखिलेश यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये विद्या बालन हिने हजेरी लावली आहे. एखादा विद्या बालन आणि महेश भट्ट यांनी अखिलेश यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. 

Web Title: Akhilesh Yadav's Bollywood connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.