फक्त १० वर्षांनीच मोठ्या आहेत अक्षयच्या सासूबाई, असे आहे दोघांचेही नाते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 04:33 PM2020-12-30T16:33:49+5:302020-12-30T16:43:44+5:30
अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली. मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता.
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे, तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या ग्लॅमरस सासूमुळे.
कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे. त्यामुळे आज अक्षय कुमार स्वतःमुळे नाही तर सासूमुळे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर डिंपल आणि अक्षय कुमार यांच्या बॉन्डींगविषयी चर्चा रंगत आहेत. दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो पाहून लाइक्स आणि कमेंटसही देत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे डिंपल अक्षयची सासू असल्या तरीही दोघांमध्ये चांगले बॉन्डींग असल्याचे पाहायला मिळते.
वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे. दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे. मात्र दोघांचं हे नातं निर्माण होण्याआधी त्याला अक्षय कुमारची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी विरोध केला होता. या विरोधाचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या कारणाचा खुलासा खुद्द अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने केला आहे.
अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली. मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. अक्षय कुमार गे अर्थात समलैंगिक असल्याचा डिंपलला संशय होता.
ट्विंकलने आपल्या आईला म्हणजेच डिंपलला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही सगळी बाब ट्विंकलच्या वडिलांना म्हणजेच सुपरस्टार राजेश खन्ना यांनी समजली.
या सगळ्या तिढ्यात त्यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर तोडगा म्हणून राजेश खन्ना यांनी अक्षय आणि ट्विंकल यांना लग्नाआधी वर्षभर एकत्र राहण्याचा सल्ला दिला. यानंतर अक्षय आणि ट्विंकल वर्षभर एकत्र राहिले. त्यानंतर डिंपलला खात्री पटली की अक्षय कुमार गे नाही आणि लेकीचं लग्न त्यांनी खिलाडी कुमारशी मोठ्या आनंदात लावून दिलं.