बाप रे बाप !अक्षय कुमारने पुन्हा मानधनात केली प्रचंड वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी
By गीतांजली | Published: December 28, 2020 11:57 AM2020-12-28T11:57:14+5:302020-12-28T12:10:19+5:30
अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे.
अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. अक्षय कुमार सतत काम करतो आणि एका दिवसाचाही ब्रेक तो घेत नाही परिणामी त्याचे 4-5 सिनेमा वर्षाला रिलीज होतात. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट केवळ 2021 मध्येच नव्हे तर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. अक्षयने आपली फिस चांगलीच वाढवली आहे.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांत अक्षय कुमारने आपल्या मानधनात बरीच वाढ केली आहे. यापूर्वी अक्षय कुमारने आपली फी 99 कोटी वरुन 108 कोटी केली होती जी 117 कोटींवर गेली आहे. प्रत्येक निर्मात्याला अक्षय कुमार आपल्या सिनेमात घ्यायचे असते. त्यांची स्वतःची मागणी लक्षात घेता अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाची फी वाढवून 135 कोटी रुपये केली आहे.
प्रत्येक निर्मात्याला असे वाटते की, अक्षय कुमारला चित्रपटात घेतल्याने रिस्क कमी होतो. कमी बजेटमध्ये एक चांगला चित्रपट बनविला जातो, ज्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.
असेही ऐकले आहे की अक्षय आपला जवळचा मित्र फिरोज नाडियाडवाला यांना स्पेशल डिस्काऊंट देतो. फिरोज यांच्या सिनेमात काम करण्यासाठी तो २०% कमी पैसे घेतो. अक्षय कुमार 'लक्ष्मी' सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. पुढचा सिनेमा 'सूर्यवंशी' रिलीजसाठी तयार आहे. अक्षयने 'बेल बॉटम'चे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या अक्षयकडे 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'राम सेतु', 'मिशन सिंह', 'रक्षाबंधन' असे अनेक सिनेमे येत्या 2 वर्षात रिलीज होणार आहेत.