अक्षय कुमार या दिवशी मुंबईत सुरु करणार सिनेमाचे शूटिंग, संपूर्ण टीमची झाली कोव्हिड-19ची टेस्ट
By गीतांजली | Updated: October 6, 2020 17:33 IST2020-10-06T17:15:17+5:302020-10-06T17:33:46+5:30
अभिनेता अक्षय कुमार आता मुंबईत त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अक्षय कुमार या दिवशी मुंबईत सुरु करणार सिनेमाचे शूटिंग, संपूर्ण टीमची झाली कोव्हिड-19ची टेस्ट
अभिनेता अक्षय कुमार आता मुंबईत त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अक्षय कुमार आपल्या सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी जोशमध्ये आहे. गेल्या आठवड्यातच आपल्या बेलबॉटम सिनेमाची स्कॉटलँडमध्ये शूटिंग पूर्ण करुन परतला आहे. आता तो 'पृथ्वीराज' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार या ऐतिहासिक सिनेमाची शूटिंग अक्षय 8 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु करणार आहे. सिनेमाचे मेकर्स सध्या तयारीला लागले आहेत. लॉकडाऊनच्या आधी अक्षयने या सिनेमाचे जवळपास 70 टक्के शूटिंग पूर्ण केले होते. मात्र त्यानंतर अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे उर्वरित शूटिंग रखडले.
शूटिंगचा भाग असणाऱ्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करायला सुरुवात केली आहे. मेकर्सने सिनेमाच्या टीमसाठी स्टुडिओजवळचे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. जोवर शूटिंग संपणार नाही तोपर्यंत कुणीच आपल्या घरी जाऊ शकणार नाही.
या सिनेमात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. ११९१ साली झालेल्या तराइन युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद गोरीचा पराभव केला होता.चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय कुमार आणि आदित्य चोप्रा मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहेत.सिनेमात मानुषी छिल्लर पृथ्वीराजची पत्नी संयोगिताची भूमिका साकारणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात ११४९ ते ११९२ चा काळ पुन्हा एकदा जिवंत करण्यात येईल. पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सगळा प्रवास या सिनेमात दाखवला जाण्याची शक्यता आहे.